होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी सगळे गावकरी ग्रामदेवतेच्या देवळात एकत्र येतात आणि ढोलताश्यांच्या गजरात, होम करून धुमधडाक्यात शिमगा साजरा करतात. हा सण साजरा करताना गावातील वाडी-वाडीमध्ये पालखी नाचवताना जुगलबंदी देखील होते. अशा या शिमगा सणाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला देण्यासाठी याच संकल्पनेवर आधारित असा ‘शिमगा’ हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘चांदणं रातीला आला शिमगा’ हे उत्साहवर्धक गाणं सोशल मीडिया वर प्रदर्शित झाले आहे.

प्रदर्शित झालेल्या या गाण्यामध्ये भूषण प्रधान थिरकताना दिसत आहे आणि त्याच्या जोडीला राजेश शृंगारपुरे, कमलेश सावंत देखील दिसत आहेत. गाण्यामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ढोलताशांच्या गजरात, जल्लोषाने शिमगा म्हणजेच होळी सण साजरा होत आहे. शिमगा सणात नारळ, पुरणपोळी अर्पण करण्याची प्रथा या गाण्यात सुद्धा दाखवली आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”
Sachet and Parampara blessed with baby boy
लग्नानंतर ४ वर्षांनी सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी मुलाचा जन्म, व्हिडीओ शेअर करून दिली Good News
Vanita Kharat
“माझा एक बॉयफ्रेंड होता…”, वनिता खरात ९०च्या दशकातील आवडत्या गाण्याचा किस्सा सांगत म्हणाली…
Aishwarya Narkar & Madhura Joshi kissik song Dance
Video : ‘पुष्पा २’च्या ‘किसिक’ गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा जबरदस्त अंदाज! मधुरा जोशीसह केला डान्स, व्हिडीओ व्हायरल
bigg boss marathi season 5 fame yogita Chavan lavani dance video viral
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”

या गाण्याचे चित्रीकरण कोकणातील लांजा येथील आसगे या गावी करण्यात आले. दिवसभर चित्रपटाचे चित्रीकरण आणि संध्याकाळ झाली की, गाण्याचे चित्रीकरण व्हायचे. तीन दिवस सतत चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अविश्रांत मेहनत घेऊन हे गाणं चित्रित केले. शिमगा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला नाचताना खूप त्रास होत होता. पेटत्या शिमग्याच्या झळांमुळे नाचताना चटके पण बसायचे. शिवाय हा शिमगा पेटवण्यासाठी जे कोरडे गवत लागायचे ते गवत पेटवताक्षणी काही सेकंदात जळून जायचे. त्यामुळे खूपच कमी वेळात जास्तीत जास्त सीन शूट केले जायचे. पण सरतेशेवटी हे शिमग्याचे गाणे पूर्ण झाले.

दीपाली विचारे यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. हे गाणं वलय यांनी लिहिले असून पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केले आहे. सौरभ साळुंखे यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे.

श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित ‘शिमगा’ हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. मूळचे कोकणाचे असणारे निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, भूषण प्रधान आणि कमलेश सावंत यांच्यासह विजय आंदळकर, सुकन्या सुर्वे आणि नवोदित अभिनेत्री मानसी पंड्या यांच्या भूमिका आहेत.

Story img Loader