लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे कुटुंबाचा महाराष्ट्रातच नाही तर सर्व देशभरात चाहतावर्ग पाहायला मिळत आहे. भक्तीगीते, कोळीगीत, भीम गीत, कव्वाली, लोकगीत अशा अनेक ठिकाणी शिंदे कुटुंबाने आपला ठसा उमटवला आहे. त्यासोबत अनेक चित्रपटात त्यांनी गाणीही गायली आहेत. प्रल्हाद शिंदे यांचा लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून त्यांनी आजच्या पिढीलाही लोकसंगीतावर ताल धरायला भाग पाडले आहे. त्यांच्या संगीताचा वारसा आनंद शिंदे आणि त्यांची नातवंड पुढे चालवताना दिसत आहेत. नुकतंच शिंदे कुटुंबाचे नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट झाले आहे. याबद्दल उत्कर्ष शिंदे याने पोस्ट लिहिली आहे.
आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक होते. तर त्यांची आजी सोनाबाई या तबलावादक होत्या. गेल्या २३ जून २०२२ रोजी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीतर्फे शिंदे कुटुंबाला ‘मोस्ट रेकॉरडेड आर्टिस्ट इन फॅमिली’हे मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिंदेशाही कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव पाहायला मिळत आहे.
“आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
उत्कर्ष शिंदेची इन्स्टाग्राम पोस्ट
23 जून 2022 काल माझे आजोबा स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे ह्यांची 18 वी पुण्यतिथी आणि कालच जागतिक दर्जाचे वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीतर्फे शिंदेशाही परिवाराचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीच्या यादीत विराजमान झाले. कालच्या दिनी हि सर्वात मोठी आदरांजली मी मानतो. शिंदेशाही परिवाराला हे मिळालेले यश हे फक्त तुम्हा रसिकजना मुळे, आमच्या सोबत काम करणाऱ्या एकूण एक कलाकारामुळे, आमच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या सर्वांचे आहे असे आम्ही मानतो .आम्हाला मिळालेले हे वर्ल्ड रेकॉर्ड कोम्मुनिटीचा मान सन्मान मी सर्व महापुरुषांच्या चरणी सादर करतो. आपण होतात आपण लढलात म्हणून आम्ही घडलो, अशी पोस्ट उत्कर्ष शिंदे याने लिहिली आहे.
पत्नी तृप्तीपासून घटस्फोट घेण्यावर सिद्धार्थ जाधवचं स्पष्टीकरण, म्हणाला “आम्ही…”
दरम्यान भगवान शिंदे यांच्या सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील संगीत क्षेत्राची सेवा केली. प्रल्हाद शिंदे यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्याने भक्तीगीतं, भीमगीतं तसेच लोकगीते आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांचा संगीताचा हाच वारसा आनंद शिंदे आणि त्यांची नातवंडे पुढे चालवताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांनी गायलेली गाणी केवळ मराठी सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही पाय थिरकायला लावणारी आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलांनी देखील संगीत क्षेत्रात उंचच उंच भरारी घेतली आहे. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक होते. तर त्यांची आजी सोनाबाई या तबलावादक होत्या.