भाजपा नेते व अभिनेते रवी किशन सध्या त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. अपर्णा ठाकुर नावाच्या एका महिलेने त्यांची पत्नी असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर तिच्या २५ वर्षांच्या शिनोवा नावाच्या मुलीचे वडील रवी किशनच आहे, असा दावाही तिने लखनऊमध्ये पत्रकार परिषदेत केला. यानंतर अभिनेत्याची पत्नी प्रीती शुक्ला यांनी या दोघींसह एकूण सहा जणांविरोधात तक्रार दिली होती. याप्रकरणी आता रवी किशन यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या तरुणीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रीती शुक्लांनी एफआयआरमध्ये अपर्णा ठाकुर व तिच्या कुटुंबावर धमकावणे, खोटे आरोप करणे आणि जबरदस्तीने पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत. शिनोवा एक अभिनेत्री असून ती ‘हिकअप्स अँड हुकअप्स’ या चित्रपटात दिसली होती. आज तकशी बोलताना शिनोवाने तिच्या कुटुंबाचा छळ होत असल्याचा दावा केला, तसेच हा वाद संपवण्यासाठी रवी किशन यांची डीएनए चाचणी व्हावी, अशी मागणी केली आहे.

आपल्या मुलीचे वडील रवी किशन असल्याचा महिलेचा दावा, प्रीती किशन यांची तक्रार करत म्हणाल्या, “२० कोटी…”

शिनोव्हा काय म्हणाली?

रवी किशन यांना उद्देशून शिनोवा म्हणाली, “जर हे खरं नसेल तर तुम्ही समोर येऊन हे खोटं आहे असं का म्हणत नाही. माझी एवढीच मागणी आहे की तुम्ही डीएनए चाचणी करा. तुम्ही गप्प आहात आणि काहीही उत्तर देत नाही. माझे संपूर्ण कुटुंब, एक वकील आणि एका पत्रकारावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे, तेही खोटे आरोप करून की आम्ही तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहोत.”

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त

माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय – शिनोवा

ती पुढे म्हणाली, “रवी किशन माझे वडील आहेत आणि मला स्वीकारा असं त्यांना म्हणण्याचा मला अधिकार आहे. हे मी आज अचानक बोलत नाहीये, यापूर्वी अनेक गोष्टी घडल्या आहे, पण मी सध्या त्याबद्दल जास्त बोलू शकत नाही. मला खूप कॉल येत असल्याने मी फोन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फक्त मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला जात आहे.”

Video: “मी रवी किशन यांची पत्नी आहे”, महिलेच्या दाव्याने खळबळ; मुलीला जाहीरपणे स्वीकारण्याची केली मागणी

नेमकं प्रकरण काय?

अपर्णा ठाकूरने दावा केला होता की १९९६ मध्ये तिने कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत रवी किशन यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी असून ते आता आपल्या सर्वांसमोर स्वीकारत नसल्याचं म्हटलं होतं. पत्रकार परिषदेत या महिलेबरोबर एक मुलगीही होती. रवी किशन आपल्या संपर्कात आहेत, पण ते सार्वजनिकरित्या मुलीला स्वीकारत नाही. आपल्या मुलीला रवी किशन यांची मुलगी असण्याचे सर्व अधिकार मिळायला हवेत, अशी मागणी या महिलेने केली होती. तिच्या या आरोपांनंतर रवी किशन यांची पत्नी प्रीती शुक्ला यांनी लखनऊमध्ये अपर्णा ठाकुर व तिच्या पूर्ण कुटुंबाविरोधात तक्रार दिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinova demands ravi kishan dna test after claiming to be his daughter hrc
First published on: 19-04-2024 at 08:01 IST