झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘काहे दिया परदेस’ या काही काळातच घराघरात लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत आता मोठे वळण येणार आहे. कारण शिव-गौरीच्या घरी आता पाळणा हलणार आहे. खरंतर आनंद साजरा करण्यासाठी या मालिकेकडे दोन कारणे आहेत. कारण नुकताच या मालिकेने नुकताच ३०० हून अधिक भागांचा पल्ला पूर्ण केला आहे.

शिव-गौरीच्या घरी पाळणा हलणार असल्याचा प्रोमोदेखील झी वाहिनीवर दाखवण्यात येतोय. मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी तसेच प्रेक्षकांना मालिकेत गुंतून ठेवण्यासाठी नवीन वळण किंवा वेगळेपण आणण्याचे प्रयत्न नेहमीच केले जातात. शिव-गौरी या दोन्ही भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असल्याने आता गौरी गरोदर असल्याचे दाखवल्यास नक्कीच जास्तीत जास्त प्रेक्षकांना गुंतून ठेवता येईल असा मालिकेच्या निर्माते-दिग्दर्शकांचा विचार असल्याचं दिसतं. त्यामुळे तसा प्रोमोसुद्धा मालिकेकडून प्रदर्शित करण्यात येतोय. या प्रोमोमध्ये शिव-गौरी पाळणा हलवताना दिसतात.

वाचा : दीपिका पदुकोणची आता ‘वंडर वूमन’ गल गडॉटशी स्पर्धा

इतर मालिकांप्रमाणे रटाळ गोष्टी न दाखवता ‘काहे दिया परदेस’मधील प्रत्येक भागातून प्रेक्षकांसमोर नेहमीच काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मग तो मालिकेचा बनारसमधला ट्रॅक असो, स्वित्झर्लंडला शिव-गौरीचा मधुचंद्र असो किंवा आता दोघांच्या आयुष्यात येणारी गोड बातमी. त्यामुळे मालिकेतील हे नवीन वळण प्रेक्षकांना कितपत आवडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान ३०० भाग पूर्ण केल्याचा आनंद मालिकेतील कलाकारांनी मिळून साजरा केला. सेटवर केक कापून आणि त्यानंतर खूप सारे सेल्फी काढून कलाकारांनी हा आनंद साजरा केला. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात तब्बल ११ पुरस्कार आपल्या नावे करणारी ही मालिका भविष्यातही प्रेक्षकांचे मनोरंजन करेल यात शंका नाही.

Story img Loader