‘बिग बॉस हिंदी’चे सोळावे पर्व नुकतेच संपले आहे. या पर्वात मूळचा अमरावतीचा शिव ठाकरे उपविजेता ठरला. अमरावतीत परतल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, बिग बॉसनंतर मला ओळख मिळालेली आहे. आता मला जास्त मेहनत घ्यायची आहे. मोाठे स्वप्न असेल तर मेहनतही तेवढीच घ्यावी लागते, असे शिव ठाकरे म्हणाला आहे. तसेच सलमान खानसोबत झालेल्या चर्चेवरही त्याने भाष्य केले आहे.

हेही वाचा >> ‘पठाण’साठी ‘व्हॅलेंटाईन डे’ ठरला लकी; छप्परफाड कमाई करत लवकरच किंग खान मोडणार ‘हा’ रेकॉर्ड

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

सलमान खानकडून कामासाठी काही ऑफर आलेली आहे का? असा प्रश्न शिव ठाकरेला विचारण्यात आला. याचे उत्तर देताना “मी बिग बॉसमध्ये खूप मनापासून काम केले आहे. सलमान खानने कोणालाही ऑफर वगैरे दिलेली नाही. मात्र त्यांनी माझे कौतुक केले. मोठ्या सर्कलमध्ये जायला भेटले त्यामुळे मी खूश आहे. सर्वांना आता शिव ठाकरे कोण आहे, हे माहिती आहे. अमरावतीतील मुलगा सलमान खानसोबत बसेल, सलमान खान त्याला ओळखेल असे कोणालाच वाटले नव्हते. बिग बॉसनंतर एक पार्टी झाली. या पार्टीमध्ये मला सलमान खानने सांगितले की तुला मराठीमध्ये मोठे प्रोजेक्ट मिळतील. हिंदीतही मिळतील. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे,” असे शिव ठाकरेने सांगितले.

हेही वाचा >> Video: शिव ठाकरेबरोबर रोमँटिक डान्स करताना दिसली अर्चना गौतम, नेटकरी म्हणाले “सगळे त्याच्या…”

“आता मला खूप मेहनत करावी लागेल. जेवढे स्वप्न मोठे तेवढीच जास्त मेहनत करावी लागेल. मी सध्या याचाच विचार करत आहेत. आताकुठे मला भारतात लोक ओळखत आहेत. मला माझ्या स्वप्नांच्या लायक बनावे लागेल. आता माझा प्रवास सुरू झालेला आहे,” असेही शिव ठाकरे म्हणाला.

हेही वाचा >>‘कांतारा’ फेम रिषभ शेट्टीची सर्वत्र चर्चा; दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळणार विशेष पुरस्कार

दरम्यान, बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांसाठी फराह खानने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये शिव ठाकरेही सामील झाला होता. पार्टीमध्ये शिव ठाकरेने चांगलीच धमाल केली. पार्टीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये तो अर्चाना गौतमसोबत डान्स करताना दिसत आहे. अर्चनानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शिवबरोबर डान्स करतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Story img Loader