मुकेश अंबानी व नीता अंबानी लवकरच पुन्हा एकदा आजी-आजोबा होणार आहेत. त्यांची सून श्लोका अंबानी ही दुसऱ्यांदा गरोदर आहे. काही दिवसांपूर्वीच ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’चा उदघाटन सोहळा मोठा दिमाखात पार पडला होता. या वेळी श्लोका अंबानीच्या बेबी बम्पने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तर आता तिच्या डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकेश अंबानी-नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता-अंबानीच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम तिच्या मैत्रिणींनी आयोजित केला होता. हा कार्यक्रम त्यांनी दणक्यात साजरा केला. या दरम्यानचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ईशा अंबानीच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

आणखी वाचा : रिसेप्शन सिद्धार्थ-कियाराचं पण चर्चा आकाश व श्लोका अंबानीच्या नम्रपणाची, व्हायरल व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

श्लोकाच्या या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमामध्ये श्लोकाच्या सर्व खास मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात श्लोकाने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता आणि डोक्यावर टियारा घातला होता. तिच्या मैत्रिणींबरोबर ग्रुप फोटोमध्ये पोज देताना तिने हातात एक पेंटिंगदेखील धरलं आहे. हे पेंटिंग तिला तिच्या मैत्रिणींनी गिफ्ट केलं असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत.

हेही वाचा : अंबानींचा शाही थाट! कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीच्या ताटातून जेवण अन् मेन्यूही होता खास

दरम्यान, आकाश व श्लोका अंबानी नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. या दोघांना पहिला मुलगा आहे, ज्याचं नाव पृथ्वी आहे. तर आता सर्व अंबानी कुटुंबीय श्लोका अंबानीची काळजी घेताना दिसत आहेत

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shloka ambani had a grand baby shower celebration with her friends photo viral rnv