प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व उद्योजिका नीता अंबानी पुन्हा एकदा आजी-आजोबा झाले आहेत. मुकेश अंबानी यांची मोठी सून श्लोका अंबानीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. श्लोका ही आकाश अंबानीची पत्नी आहे. आकाश व श्लोका यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. अंबानींच्या घरात लेकीचा जन्म झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, श्लोका अंबानीने ३१ मे रोजी मुलीला जन्म दिला. श्लोका अंबानीने काही महिन्यांपूर्वीच गरोदर असल्याची गोड बातमी दिली होती. काही दिवसांपूर्वीच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. श्लोका अंबानीचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. श्लोका अंबानी व आकाश अंबानी यांनी कुटुंबीयांसह काही दिवसांपूर्वीच सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं.

आकाश अंबानी व श्लोका अंबानी २०१९ साली विवाबंधनात अडकले. २०२१ साली श्लोकाने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव पृथ्वी असं आहे. त्यानंतर आता आकाश व श्लोका पुन्हा एकदा आईबाबा झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shloka and akash ambani blessed with baby girl mukesh ambani neeta ambani become grand parents kak