सध्या भारतीय टीमचा माजी कर्णधार त्याच्या कारकिर्दीतील कठीण काळातून जात आहे. जिथे त्याला मोठी शतके पूर्ण करण्यास कठीण जात आहे. एवढंच काय तर त्याने सर्व फॉरमॅटमधले कर्णधारपद सोडले आहे. यावरून आता माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नावर मोठे विधान केले आहे. अनुष्काशी लग्न केल्यामुळे विराटच्या खेळावर त्याचा परिणाम होतो, असे शोएब म्हणाला आहे.
दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत शोएब म्हणाला, “विराट ६-७ वर्षे कर्णधार होता आणि मी कधीही त्याच्या कर्णधारपदाच्या बाजूने नव्हतो, त्याने १०० आणि १२० रन करत रहावे आणि त्याच्या बॅटिंगकडे संपूर्ण लक्ष द्यावे असे मला वाटते.”
तो पुढे म्हणाला, “मी त्याच्या जागी असतो तर मी लग्नही केले नसते. मी फक्त धावा केल्या असत्या आणि क्रिकेटचा आनंद लुटला असता. क्रिकेटची ही १०-१२ वर्षे वेगळी असतात आणि पुन्हा येत नाही, मी लग्न करण चुकिचं आहे असं म्हणत नाही, पण जर तुम्हाला भारतासाठी खेळायचं असेल तर तुम्हाला थोडा वेळ मिळाला असता. विराटचे खूप चाहते आहेत आणि गेल्या २० वर्षांपासून वर्षांपासून त्याला मिळत असलेले प्रेम त्याला कायम टिकवून ठेवावं लागेल.”
लग्नाचा क्रिकेटपटूच्या आयुष्यावर परिणाम होतो का? असा प्रश्न विचारता शोएब म्हणाला, “नक्कीच लग्नाचा परिणाम होतो. मुलांचा, कुटुंबाचा दबाव असतो, जबाबदारी वाढते म्हणून दडपण असते. क्रिकेटपटूंची १२ ते १५ वर्षांची छोटा काळ असतो. ज्यामध्ये तुम्ही पाच-सहा वर्षे यशाच्या शिखरावर असतात. विराटची ती वर्षे आता निघून गेली आहेत, आता त्याला संघर्ष करावा लागेल.”