पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला भारतीय सिनेमांची आवड आहे. काही दिवसांपूर्वीच ‘रावलपिंडी एक्सप्रेस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सुप्रसिद्ध क्रिकेटपटूने तो आणि त्याचं कुटुंब हे बॉलीवूड अभिनेता आमिर खानचे फॅन असल्याचं जाहीर केलं होतं. नुकतंच त्याने त्याच्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ अपलोड केलाय. या व्हिडीओमध्ये शोएबचा मुलगा टीव्हीच्या समोर उभा आहे आणि आमिर खानच्या ‘तारें जमीन पर’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमिर खानचा ‘तारें जमीन पर’ हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात आमिर खानसोबतच दर्शील सफारी, टिस्का चोपडा आणि विपिन शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ‘डिस्लेक्सिया’ नावाच्या आजाराने पिडीत एका लहान मुलावर आधारित आहे. या आजारात अक्षरांना लिखित स्वरूपात ओळखणं आणि त्यांचा उच्चार करणं अडचणीचं ठरतं. या आजाराशी सामना करत लहान मुलगा त्याच्या करिअरमध्ये प्रगती करताना चित्रपटात दाखवण्यात आलंय.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने त्याच्या लहान मुलाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये शोएबचा मुलगा आमिर खानचं गाणं एन्जॉय करताना दिसून आला. शोएबने शेअर केलेल्या या व्हिडीओवर त्याच्या फॅन्सनी लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “आमिर खानचं काम आजही प्रत्येक लहान मुलासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा एक चमत्कार करतोय”, असं त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

शोएब अख्तरने यापूर्वी माध्यमाशी बोलाताना त्याच्यावर बायोपिक बनली तर त्यात अभिनेता सलमान खानने काम करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. शोएबचं करिअर आतापर्यंत सगळ्यात छोटं आणि वाद-विवादांनी भरलेलं ठरलंय. त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर सुद्धा तो यशाच्या शिखरावर येऊन पोहोचलाय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib akhtar responds as his son enjoys a song from taare zameen par prp