‘ससुराल सिमर का’ फेम शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कडची जोडी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शोएब सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याचे लाखो चाहते आहेत. एका नेटकऱ्याने दीपिकाला त्रासदायक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, शोएबने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएबने इन्स्टाग्रामवरील ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी काही नेटकऱ्यांनी शोएबला त्याच्या प्रोफेशन्ल आणि वैयक्तिक आयुष्या विषयी अनेक प्रश्न विचारले. एक नेटकरी म्हणाला, “दीपिका एवढी का ओरडते? तुम्हाला हे त्रासदायक वाटतं नाही का?” त्याला उत्तर देत शोएब म्हणाला, “तुम्हाला हे त्रासदायक वाटेल पण मला, माझं कुटुंब आणि दीपिकाला ओळखत असलेल्या लोकांना हे त्रासदायक वाटत नाही,” असे शोएब म्हणाला.

आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

शोएबने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

शोएब पुढे म्हणतो, “हरकत नाही, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि जे तिचे चाहते आहेत. दीपिका त्यांच्यासाठी अनमोल आहे. इतर लोक काय विचार करतात याने काही फरक पडत नाही,” असे बोलत शोएबने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : ‘तू तिसरं लग्न करणार आहेस?’ श्वेता तिवारी झाली ट्रोल

दरम्यान, ‘AskMeAnything’ या सेशन दरम्यान, चाहत्यांनी शोएबला त्याच्या वर्कआऊट आणि डायट प्लॅन विषयी अनेक प्रश्न विचारले. शोएब आणि दीपिका हे दोघे ही यशस्वी यूट्यूबर आहेत. सध्या दीपिका ही ससुराल सिमर का २ या मालिकेच्या चित्रकरणात व्यस्त आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib ibrahim slams troll who insults and calls dipika kakar irritating respond s with a savage reply dcp