पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकनं जानेवारीमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच शोएबच्या तिसऱ्या लग्नाची बातमी समोर आली होती. सध्या शोएब एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री नवाल सईदला शोएब फ्लर्टिंगचे मेसेज पाठवायचा, अशा चर्चांना आता उधाण आलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लाइफ ग्रीन है’ या पाकिस्तानी चॅट शोला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री नवाल सईदनं अनेक गोष्टींवर भाष्य केलं. पाकिस्तानी क्रिकेटर्सकडून तिला फ्लर्टिंगचे मेसेज आल्याचाही तिनं खुलासा केला. त्यावरून हे मेसेज शोएबनं केले असावेत, अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत.

हेही वाचा… “मी माझं नावच विसरले” मिताली मयेकरने सांगितला ‘तो’ किस्सा; सिद्धार्थ म्हणाला, “शंखपुष्पी प्यायचं बाळा…”

मुलाखतीत अभिनेत्री नवाल सईद सांगितलं की, तिला अनेक क्रिकेटर्सनी मेसेज केले आहेत. विवाहित क्रिकेटर्सकडूनही तिला मेसेज आले आहेत, असंही तिनं शोच्या होस्टला सांगितलं. जेव्हा तिला विचारण्यात आलं, “तू शोएबबद्दल बोलत आहेस का?” तेव्हा नवाल सईद हसली आणि प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, “मी त्या क्रिकेटरचं नाव विसरली.”

क्रिकेटरनं मेसेज केलेला अभिनेत्रीला अजिबात आवडत नाही. तिला नक्की काय मेसेज यायचा याबद्दल विचारलं असता, नवाल म्हणाली, “मला यावर काहीचं बोलायचं नाही. मला फक्त एवढंच वाटतं की, क्रिकेटरनं असं वागू नये. अभिनेत्यांपेक्षा लोक क्रिकेटर्स / खेळाडूंना आपला आदर्श मानतात. जर तुम्हाला वाटतं की, लोकांनी तुम्हाला प्रसिद्ध व्यक्ती किंवा एक आदर्श म्हणून ओळखावं, तर तुम्ही असा मेसेज कोणालाही करू नये.”

हेही वाचा… लक्ष्मीच्या पावलांनी : नयना प्रेग्नंट अन्…; कलाने उघड केलं राहुलचं सत्य, पाहा प्रोमो

दरम्यान, शोएबच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, २० जानेवारी २०२४ रोजी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करीत शोएब आणि सनानं त्यांच्या निकाहची बातमी जाहीर केली. शोएबचं पहिलं लग्न आयेशा सिद्दीकीशी, तर दुसरं लग्न टेनिसपटू सानिया मिर्झाशी झालं होतं. सानिया आणि शोएब २०१० मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांचा मुलगा इझान मिर्झा-मलिकच्या संगोपनाची जबाबदारी दोघांनीही घेतली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib malik sent flirting messages to pakistani actress nawal saeed after his marriage with sana javed dvr