सानिया मिर्झाच्या वैवाहिक आयुष्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर तिचा पती शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरं लग्न केलं आहे. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता याच चर्चांदरम्यान शोएब मलिकने इन्स्टाग्रामवर त्याच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएब आणि सानिया मिर्झा २०१० मध्ये विवाहबंधनात अडकले होते. शोएबचं हे दुसरं लग्न होतं. त्याआधी त्याचा आयेशा सिद्दीकीबरोबर घटस्फोट झाला होता. लग्नानंतर शोएब-सानिया दुबईत राहतो होते. पुढे, २०१८ मध्ये सानियाने इजहानला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये शोएब-सानियाचं नात संपुष्टात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु, या दोघांनीही याची कधीही पुष्टी केली नाही. आता शोएबने थेट सना जावेदबरोबर फोटो शेअर करत लग्नाची घोषणा केली आहे.

हेही वाचा : “माझ्या शाळेत पाचवीनंतर मराठी विषय…”, सुप्रिया पिळगावकरांनी लेकीसाठी घेतला होता मोठा निर्णय, श्रिया म्हणाली, “आईने…”

३० वर्षीय सना जावेद ही पाकिस्तानातील लोकप्रिय आहे. तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अगदी लहान वयात तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत करिअरला सुरुवात केली होती. शोएब आणि सनाने काही जाहिरातींच्या शूटसाठी एकत्र काम केलं होतं. यादरम्यान त्यांची मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शोएब-सनामध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर आहे.

हेही वाचा : ‘सनई चौघडे’नंतर तब्बल १६ वर्षांनी पुन्हा जमली सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे जोडी! कारण आहे खूपच खास…

दरम्यान, शोएब मलिकचा हा तिसरा, तर सनाचा हा दुसरा विवाह आहे. २०२० मध्ये तिने पाकिस्तानी अभिनेता उमैर जैस्वालबरोबर निकाह केला होता. याशिवाय सानिया मिर्झाबद्दल सांगायचं झालं, तर तिने टेनिसमधून निवृत्ती घेऊन जवळपास एक वर्ष झालं आहे. तिने आपला शेवटचा विम्बल्डन सामना ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णासोबत खेळला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib malik third marriage what is the age gap between pakistani actress sana javed and cricketer sva 00