दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी ‘सैराट’ची प्रशंसा केली.
अनेक बॉलीवूडकरांनी सैराट चित्रपट पाहण्याचे आवाहन देखील केले. ‘सैराट’वर आता लेखिका शोभा डे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘सैराट’पण थांबवू शकत नसल्याचे शोभा डे यांनी ट्विट केले असून, चित्रपटासह संगीतकार अजय-अतुल यांचेही भरभरून कौतुक केले आहे. चित्रपटातील झिंगाट गाण्याचाही खास उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
दरम्यान, इरफान खान यानेही ‘सैराट’चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले असून, सध्याच्या तरुण पीढीने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा ६५ कोटींच्यावर गेला आहे.

Story img Loader