‘ये हात मुझे दे दे..’, ‘बसंती इन कुत्तो के सामने..’, ‘कितने आदमी थे..’ अशा गाजलेल्या संवादांनी आणि अमिताभ-धर्मेंद्र यांचा अप्रतिम अभिनयाने बॉलीवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेला ‘शोले’ चित्रपट पाकिस्तानात पहिल्यांदाच प्रदर्शित होणार आहे. तब्बल चाळीस वर्षांनंतर ‘शोले’ पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होत आहे.
१९७५ साली प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटाने हिंदी चित्रपट सृष्टीत धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने अनेक विक्रम रचले. हीबाब लक्षात घेऊन पाकिस्तानच्या सिनेसृष्टीतील प्रमुख चित्रपट वितरक असलेल्या ‘मांडवीवल्ला एण्टरटेन्मेंट’ चे प्रमुख नदीम मांडवीवल्ला यांनी शोले चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, “पायरसीद्वारे हा चित्रपट पाकिस्तानमधील 50 टक्के लोकांनी पाहिला आहे किंवा त्याबद्दल त्यांना माहित आहे. मात्र, चित्रपटगृहात “शोले‘ पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. पाकिस्तानातील चित्रपट रसिकांना हा आनंद देण्यासाठी शोले चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्धार केला आहे.” हा चित्रपट सर्व पिढीतील लोकांना आकर्षित करत असल्याचे सांगत २३ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रस्तावित असल्याचेही ते पुढे म्हणाले.
‘शोले’ पहिल्यांदाच पाकिस्तानात
'ये हात मुझे दे दे..', 'बसंती इन कुत्तो के सामने..', 'कितने आदमी थे..' अशा गाजलेल्या संवादांनी आणि अमिताभ-धर्मेंद्र यांचा अप्रतिम अभिनयाने बॉलीवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेला 'शोले' चित्रपट पाकिस्तानात पहिल्यांदाच प्रदर्शित होणार आहे.
First published on: 06-02-2015 at 05:26 IST
TOPICSशोले
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sholay makes its pakistan debut