भारतात ४० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन व धर्मेद्र यांचा ‘शोले’ हा गाजलेला चित्रपट पाकिस्तानात प्रथमच प्रदर्शित करण्यात आला आहे. शुक्रवारपासून हा चित्रपट दाखवण्यास सुरुवात झाली.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांचे असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील तो एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. जिओ फिल्म्स व मांडवीवाला एन्टरटेन्मेंट यांनी कराचीतील न्यूप्लेक्स चित्रपटगृहात हा चित्रपट लावला आहे. या वेळी अनेक सेलेब्रिटीजची उपस्थिती होती. ‘शोले’ हा पाकिस्तानात लोकप्रिय चित्रपट असून, तो यापूर्वी व्हीसीआरवर बेकायदेशीरपणे लोकांनी बघितला, पण आता तो अधिकृतपणे दाखवला जात आहे असे चित्रपट समीक्षक ओमेर अलावी यांनी सांगितले. आम्ही आमच्या आईवडील व नातेवाइकांकडून या चित्रपटाविषयी ऐकले असून, तो प्रथमच टूडी व थ्रीडी स्वरूपात दाखवला जात आहे. नदीम मांडवीवाला यांनी चित्रपटाचे पाकिस्तानात वितरण केले असून, त्यांना त्यात मोठय़ा व्यवसायाची अपेक्षा आहे. १ मे रोजी अ‍ॅव्हेंजर्स-एज ऑफ अल्ट्रॉन हा चित्रपट दाखवला जाणार असून, ‘शोले’ची गर्दी तरीही कमी होणार नाही असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा