कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने विक्रम बत्रा यांची व्यक्तिरेखा साकारली होती. शेरशाहमुळे सिद्धार्थच्या करियरला भरारी मिळाली. या सुपरहिट चित्रपटाआधी त्याचे काही चित्रपट फ्लॉप झाले होते. शेरशाह हा चित्रपट सिद्धार्थसाठी लकी ठरला. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही जोडी पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘शेरशाह’ चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एका सैनिकाचे पात्र साकारणार आहे. करन जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘योद्धा’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ सैन्यातील एका जवानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा खुद्द करन जोहरने गेल्या वर्षी केली होती. दरम्यान या चित्रपटाशी निगडीत माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या या अ‍ॅक्शनपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम मनालीला पोहचली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योद्धा चित्रपट नव्वदीच्या दशकातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच सिद्धार्थसह दिशा पटानी आणि राशी खन्ना या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

करण जोहर सोशल मीडियावर सक्रिय आहे. तो त्याच्या चित्रपटांबद्दलचे अपडेट्स सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. करणने नोव्हेंबर महिन्यात त्याच्या या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्याने “यशाची शिखरे जिंकल्यानंतर, धर्मा प्रोडक्शनच्या ‘योद्धा’ या पहिल्या अ‍ॅक्शन फ्रँचायझीची घोषणा करताना मला फार आनंद होत आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिका करणार असून सागर आब्रे आणि पुष्कर ओझा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.” असे म्हटले होते. ‘योद्धा’ चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे करने सांगितले होते.

आणखी वाचा – “बॉयकॉट बॉलिवूडचा परिणाम तंत्रज्ञांवर.. ” अभिनेत्री पल्लवी जोशी यांची प्रतिक्रिया चर्चेत

सध्या सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या ‘थॅंक गॉड’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. त्याचा हा चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.