आगामी ‘शॉर्टकट’ सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी या सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी आवर्जून उपस्थित होती.
“सायबर क्राइम” सारखा अत्यंत ज्वलंत विषय ‘शॉर्टकट’ दिसतो पण नसतो, या सिनेमातून अतिशय उत्तम पद्धतीने मांडण्यात आला आहे. या सिनेमाला “शॉर्टकट” यश न मिळता घवघवीत असे उत्तम यश मिळू दे, अशी आशा व्यक्त करून अभिनेते स्वप्नील जोशी यांनी या सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. या सिनेमात रोहित प्रधान ही व्यक्तिरेखा मी साकारली असून हा एक उत्तम हॅकर असतो. माझा अगदी जवळचा आणि शालेय मित्र विनय नारायणे यांने सिनेमाची कथा उत्तम लिहिली असून सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने चित्रितदेखील झाल्याचे अभिनेता वैभव तत्ववादी याने सांगितले. “सायबर क्राइम” सारखा अत्यंत ज्वलंत विषय ‘शॉर्टकट’ दिसतो पण नसतो, या सिनेमातून अतिशय उत्तम पद्धतीने मांडण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हरीश राऊत यांचे असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.
या सिनेमाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमासाठी एक दोन नव्हे तर तब्बल सहा संगीतकार लाभले आहेत. सध्या या सिनेमातील “मखमली…. हे गाणे प्रसिद्ध झाले असून संगीतकार निलेश मोहरीर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. गायिका सावनी रविंद्र आणि कौशिक देशपांडे यांच्या मधुर आवाजाने या सॉफ्ट रोमॅंटिक गाण्याला चार चाँद लागल्याचे संगीतकार निलेश मोहरीर यांनी सांगितले.
“शॉर्टकट” सिनेमात अभिनेते राजेश शृंगारपुरे, वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे या त्रिकुटाचा उत्तम अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे. संगीतकार निलेश मोहरीर, सुशांत-शंकर, प्रेमानंद, पुनीत दीक्षित, चाँद साध्वानी आणि निक अशा संगीतकारांचे संगीत या सिनेमाला लाभले असून सिनेमातील गाणी गायक स्वप्नील बांदोडकर, कौशिक देशपांडे, मोहोमद इरफान, निक, अभिषेक, अमित मिश्रा, असित त्रिपाठी, गायिका सावनी रविंद्र, आनंदी जोशी आणि राही यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत. तर असा हा ‘शॉर्टकट’ दिसतो पण नसतो, सिनेमा येत्या ७ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘एम के मोशन पिक्चर्स’चे मुकेश चौधरी आणि चित्रकार फिल्म्सचे बी. आर. देढीया यांनी  ‘शॉर्टकट’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा