सध्याची युवापिढी ही इंटरनेट, सोशल मिडिया, मोबाईल फोन आणि विविध अॅप्लिकेशन्सच्या कचाट्यात पूर्णतः गुंतत जात असल्याचे चित्र आपल्या सर्वत्र पहायला मिळत आहे. एका बाजूला विज्ञानाची होणारी जलद गतीची प्रगती आपल्याला उपयुक्त जरी ठरत असली तरी दुसऱ्या बाजूला ह्या प्रगतीचा गैरवापर देखील जगात  मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळेच सायबर क्राइमसारख्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हल्लीची युवापिढी पैसा, प्रसिद्ध मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’ चा मार्ग अवलंबायला जराही मागे पुढे पाहात नाही, पण हाच ‘शॉर्टकट’ कधीतरी वेगळं वळण घेउन आपल्याला घातक ठरू शकतो याचा जराही विचार या तरुण मंडळीना नसतो.”सायबर क्राइम” सारखा अत्यंत ज्वलंत विषय ‘शॉर्टकट’ दिसतो पण नसतो, या आगामी सिनेमातून अतिशय उत्तम पद्धतीने मांडण्यात आला आहे.   
         
‘एम के मोशन पिक्चर्स’चे मुकेश चौधरी आणि चित्रकार फिल्म्सचे बी. आर. देढीया यांची निर्मिती असलेल्या ‘शॉर्टकट’ सिनेमाचे दिग्दर्शन हरीश राऊत यांनी केले असून त्यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेते राजेश शृंगारपुरे, वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे या त्रिकुटाचा उत्तम अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे. सिनेमाची कथा, पटकथा हरीश राऊत यांचीच असून संवाद विनय नारायणे, राजेश बाळापुरे व हरीश राऊत यांचेच आहेत. शकील खान यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिले असून या सिनेमात रॉक संगीतासोबतच रोमॅंटिक संगीताची मेजवानी आपल्याला मिळणार आहे. सिनेमातील गीतांना संगीतकार निलेश मोहरीर, सुशांत शंकर आणि प्रेमानंद यांचे सुमधुर संगीत लाभले आहे.  
तर असा हा रोमॅंटिक आणि थ्रिलरचे अनोखे कॉम्बिनेशन असलेला ‘शॉर्टकट’ दिसतो पण नसतो, सिनेमा १० जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा