सध्या श्रध्दा कपूर जुहू परिसरातील गल्ल्यांमधून बाईक चालवताना दिसते. योगोयोग म्हणजे कतरिना कैफने झोया अख्तरच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटात चालवलेल्या एन्फिल्ड सारखीच ही बाईक आहे. अधिक चौकशी केली असता समजले की, ‘आशिकी २’ची ही अभिनेत्री ‘द व्हिलन’ या तिच्या आगामी चित्रपटासाठी बाईक चालविण्याचा सराव करीत आहे. अलिकडेच ‘बॅंग बॅंग’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी कतरिनालासुध्दा बाईक चालवताना पाहण्याचा योग आला. या चित्रपटात ती हृतिक रोशनबरोबर काम करत आहे.
श्रध्दा कपूर ‘द व्हिलन’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी सर्वतोपरी मेहनत घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ती बाईक चालवायला शिकत आहे. ‘बालाजी मोशन पिक्चर्स’च्या या रोमॅन्टीक थ्रिलर चित्रपटात सिध्दार्थ मल्होत्रा आणि श्रध्दाची जोडी दिसणार असून, चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरीचे आहे. या दोघांनी आपल्या पहिल्याच चित्रपटात बॉक्स ऑफिसवरील यशाची चव चाखली आहे. श्रध्दा खूप लवकर बाईक चालवायला शिकत असल्याचे सुत्रांकडून समजले.

Story img Loader