‘एबीसीडी २’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असलेली श्रद्धा कपूर ‘बागी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाच्या शुटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी आपण अधीर असल्याचे श्रद्धाने म्हटले आहे. येत्या १५ दिवसांत ती टागर श्रॉफबरोबर शुटिंगला सुरुवात करणार आहे. टायगर आणि ‘बागी’च्या टीमबरोबर सेटवर सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगत ती म्हणाली, या आधीदेखील मी दोन वेळा त्यांना भेटले असून, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हा धमाल-मस्तीचा असणार आहे यात शंकाच नाही. सध्या ती चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेची तयारी करण्यात व्यस्त असल्याचे सूत्रांकडून समजते. चित्रपटातील तिचा लूक आणि अन्य बाबींवर विचारविनिमय सुरू असून, याबाबत अंतिम निर्णय होताच ती शुटिंगला सुरुवात करणार आहे. साजिद नाडियादवालांच्या या चित्रपटाच्या कथेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत असून, ही एका विद्रोही तरुणाची कथा आहे इतकीच माहिती उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा