फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘रॉक ऑन २’ चित्रपट सप्टेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. २००८ प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन’ चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शित होत असल्याने चित्रपट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘रॉक ऑन २’ या चित्रपटात फरहान अख्तर संगीतकाराची भूमिका साकारताना दिसेल. येत्या ऑगस्ट महिन्यात चित्रीकरणास सुरुवात होणार असून पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याची माहिती फरान अख्तरने दिली.
फरहान आणि श्रद्धाला प्रथमच चित्रपटात एकत्र पाहण्याची संधी चाहात्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून अर्जून रामपाल देखील या चित्रपटात दिसणार आहे. ‘एक विल्हन’ चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करणारी श्रद्धा या चित्रपटात देखील आपली गायकी सादर करणार आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा