दिग्दर्शक मोहित सुरीच्या ‘आशिकी-२’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक था व्हिलन’ या चित्रपटांमुळे श्रद्धा कपूरची बॉलीवूडमध्ये स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे मोहित सुरीच्या प्रत्येक चित्रपटात काम करायला मला आवडेल असे श्रद्धाने सांगितले. श्रद्धा कपूरने ‘तीन पत्ती’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तरी, तिला खरी ओळख मिळवून दिली मोहित सुरीच्या ‘आशिकी-२’ या चित्रपटाने. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा व्यवसाय केला आणि आता ‘एक था व्हिलन’सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. मोहित सुरीबरोबरच्या सलग दुसऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असल्याने श्रद्धा कपूर सध्या मोहितवर प्रचंड खुश आहे. त्यामुळे आगामी काळात मोहितच्या प्रत्येक चित्रपटात काम करायला आवडेल, असे श्रद्धाने सांगितले. 

Story img Loader