बॉक्स ऑफीसवर दर आठवड्याला नवनवे चित्रपट प्रदर्शित होत असतानाही राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री’ या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत ‘स्त्री’ने बाजी मारली असून या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
बॉक्स ऑफीसवर कमाईच्या या शर्यतीत श्रद्धा कपूर लवकरच आलिया भट्टला मागे टाकणार असं म्हणायला हरकत नाही. आलियाचा ‘राजी’ आणि श्रद्धाच्या ‘स्त्री’ हे दोन्ही चित्रपट स्त्री-प्रधान भूमिकांवर आधारित आहेत. ‘राजी’ने बॉक्स ऑफीसवर १२२.०७ कोटी रुपयांची कमाई केली आणि आता श्रद्धाचा ‘स्त्री’ हा विक्रम मोडण्यास सज्ज झाला आहे. कारण ‘स्त्री’ची आतापर्यंतची कमाई ही १२०.६ कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कमाईचा आकडा वाढून श्रद्धाचा हा चित्रपट या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वाचा : आमिरचं सर्वांत मोठं स्वप्न अखेर झालं पूर्ण
आलिया भट्ट, श्रद्धा कपूरसोबतच या दोन्ही चित्रपटांतील त्यांचे सहकलाकार विकी कौशल आणि राजकुमार राव यांनीही दमदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘राजी’ हा चित्रपट आलियाच्या करिअरमधील तर ‘स्त्री’ हा चित्रपट श्रद्धाच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट ठरला.