‘आशिकी २’ प्रदर्शित होताच श्रध्दा कपूर नावारूपाला आली. माध्यामातील तिचे महत्व वाढले. अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तिला बोलावण्यात योऊ लागले. आता श्रध्दा एका फुटबॉल सामन्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहे. ‘आशिकी २’ ची ही अभिनेत्री फुटबॉल खेळाची खूप मोठी चाहती असल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. आपल्या या फुटबल प्रेमापोटीच तिने ‘मुंबई फुटबॉल क्लब’च्या १९ वर्षाखालील सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे कबूल केले. या विषयी बोलतांना ती म्हणाली, पुन्हा एकदा मैदानावर जातांना मला मजा येणार आहे. श्रध्दा मुंबई संघातर्फे राज्य पातळीवर हॅन्डबॉल आणि परदेशात शिकत असतांना फुटबॉल खेळायची. करिना कपूर आणि इमरान खानच्या ‘गोरी तेरे प्यार मे’ चित्रपटात श्रध्दा एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader