आशिकी-२ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली श्रद्धा कपूर आता आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. करण जोहरच्या आगामी ‘उंगली’ चित्रपटात ती आयटम साँग करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला इमरानही सदर गाण्यात नृत्य करणार आहे. ‘उंगली’चे दिग्दर्शन रेन्सील डीसिल्वा करत असून संजय दत्त, नेहा धुपिया, इमरान हाश्मी, रणदीप हुड्डा, कंगना रनावत यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. करण जोहरच्या ‘गोरी तेरे प्यार मै’ चित्रपटात करीना आणि इमरान खानसोबत श्रद्धा काम करणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘द विलन’ चित्रपटात श्रद्धा सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.

Story img Loader