‘आशिकी २’ चित्रपटातील आरोहीच्या भूमिकेमुळे लाखोंच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही ख-या आयुष्यातही एक गायिका आहे. तिच्या आगामी ‘एक विलन’ या चित्रपटाद्वारे ती गायन क्षेत्रात पदार्पण करत आहे.
नुकतेच तिने अंकित तिवारी या गायकासोबत ‘गालिया’ या गाण्याचे रेकॉर्डिंग केले. गायन क्षेत्रात श्रद्धाचे हे पहिलेच पाऊल असून, अभिनय क्षेत्रातील तिची प्रतिस्पर्धी आलिया भटने ‘हायवे’ चित्रपटात ‘सूहा सूहा’ हे गाणे गायले होते. बालाजी मोशनची निर्मिती असलेल्या ‘एक विलन’ चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरीचे आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २७ जूनला प्रदर्शित होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा