Shraddha Walkar Murder Case: वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेऊन तब्बल तीन आठवडे तो टप्प्याटप्प्यात त्याची विल्हेवाट लावत होता. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. मात्र या घटनेनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. यानंतर या घटनेप्रकरणी विविध कलाकार संताप व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे हा नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो अनेकदा विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्याचे स्पष्ट मत मांडताना दिसतो. नुकतंच त्याने त्याच्या अधिकृत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अप्रत्यक्षरित्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर मत मांडले आहे.
आणखी वाचा : Shraddha Murder Case: भाड्याचे घर, फ्रिज, मृतदेहाचे तुकडे; श्रद्धा आणि आफताबच्या दिल्लीतील ‘त्या’ घराचे Inside Photos

आस्ताद काळेची पोस्ट

“तिचं त्याच्याशी भांडण झालं, त्यात तिचा मृत्यू झाला..” अशी बातमी वाचली. जोडीदाराबरोबरच्या भांडणात चुकून मृत्यू झाला हेच पटत नाही….. पुढे जे घडलं ते तर शत्रूच्या बाबतीतही घडू नये, अशी पोस्ट आस्ताद काळेने केली आहे.

आस्ताद काळेच्या या पोस्टनंतर अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : “मेरा अब्दुल ऐसा…” श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान श्रद्धाचे २०१९ पासून आफताबशी प्रेमसंबंध होते. तेव्हा ते दोघेही वसईला वास्तव्याला होते. एका डेटिंग अ‍ॅपवर त्यांची ओळख झाली होती. ते दोघे एकाच कॉल सेंटरमध्ये काम करत होते. काही महिन्यांनंतर श्रद्धाने तिच्या कुटुंबियांना अफताब आणि तिच्या नात्याबद्दल सांगितले. आंतरधर्मीय विवाहाला विरोध असल्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. कुटुंबियांचा विरोध पत्करत ती आफताबसह नायगाव येथे राहायला गेले. मार्च २०२२ मध्ये ते दिल्लीला राहायला गेले. दिल्लीला गेल्यावर श्रद्धाने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. या मुद्द्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. भांडणादरम्यान आफताबने गळा आवळून तिचा खून केला, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha walker murder case marathi actor aastad kale facebook post viral nrp