२०२४मधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘पुष्पा २: द रुल’. या चित्रपटाच्या गाण्यांनी आणि ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आतापर्यंत ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील तीन गाणी प्रदर्शित झाली आहेत. पण, यामधील ‘सूसेकी’ गाण्यांचं वेड अजूनही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहा महिन्यांपूर्वी ‘पुष्पा २: द रुल’मधील ‘सूसेकी’ गाणं प्रदर्शित झालं होतं. गाण्यात अल्लूसह नॅशनल क्रश श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना दिसली. या गाण्यात पुन्हा एकदा दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या गाण्यातील हूकस्टेपची सगळ्यांना भुरळ पडली. अजूनही सोशल मीडियावर प्रत्येक जण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तेलुगूसह काही भाषांमध्ये ‘सूसेकी’ गाणं प्रदर्शित झालं असून प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने गायलं आहे. अशातच ‘पुष्पा २: द रुल’ प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. ५ डिसेंबरला हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – Video: दुआ लिपाने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या चाहत्यांना दिलं जबरदस्त सरप्राइज, सुहाना खान व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्तानेच सुप्रसिद्ध गणेश आचार्य यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेया घोषाल गणेश आचार्य यांच्याबरोबर ‘सूसेकी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोघांच्या या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी मधुराणी प्रभुलकरचं भाष्य, म्हणाली…

श्रेया घोषाल आणि गणेश आचार्य यांच्या डान्स व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “जबरदस्त”, “पहिल्यांदाच श्रेयाचा डान्स पाहिला”, “सुपर”, “वाव” आणि हार्टचे इमोजी प्रतिक्रियेतून नेटकऱ्यांनी दिले आहेत. श्रेया आणि गणेश यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर लवकरच झळकणार नव्या भूमिकेत, इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये केला खुलासा; म्हणाली, “पुढचा प्रोजेक्ट…”

दरम्यान, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना व्यतिरिक्त फहाद फासिल, सुनील, जगपति बाबू, जगदीश आणि अनसूया भारद्वाजसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बूकिंगला काही दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे. त्यामुळेच प्रदर्शनाच्या पूर्वीच चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. ‘कोईमोई’च्या वृत्तानुसार, १२ तासांत १ लाखांहून अधिक तिकीट विक्री झाली आहे. तसंच नव्या माहितीनुसार, १ डिसेंबरला ११ वाजेपर्यंत चित्रपटाने ९.५५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘पुष्पा २: द रुल’ बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreya ghoshal and ganesh acharya dance on sooseki song of pushpa 2 movie pps