जगातील सर्वाधिक चर्चेमधील मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटर कंपनीमध्ये भारतीय व्यक्तीची सीईओपदी नियुक्ती झाल्याने सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पराग अग्रवाल यांना सीईओपदी नियुक्ती करणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर पराग अग्रवाल यांच्या नावाची घोषणा झाली. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर पराग अग्रवाल यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. यातील एक चर्चा बॉलिवूड गायिका श्रेया घोषालशी संबंधित होती.

Twitter चे सीईओ पराग अग्रवाल आणि गायिका श्रेया घोषालचे खास नातं तुम्हाला माहितीये का?

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

सोशल मीडियावर अनेकजण पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल यांच्यात नेमकं काय कनेक्शन आहे याचा शोध घेत होते. पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल यांचा एक जुना फोटोही सोबत व्हायरल होत होता. दरम्यान श्रेया घोषालने ट्वीट करत हा शोध घेणाऱ्यांना उत्तर दिलं असून ज्यावेळी ट्वीटरला सुरुवात झाली तेव्हा आम्ही लहान मुलं होतो असं म्हटलं आहे.

हेही वाचा : “माझ्या राजीनाम्याचं पहिलं कारण त्याची…”, ट्विटरच्या सहसंस्थापकांचं पराग अग्रवालांविषयी मोठं विधान

Twitter ला मिळणार Made In India सीईओ… जाणून घ्या पराग अग्रवाल नक्की आहेत तरी कोण?

श्रेयाने ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे –

“अरे यार तुम्ही लोक किती लहानपणीचे ट्वीट्स काढत आहात? त्यावेळी ट्विटर नुकतंच सुरु झालं होतं. १० वर्षांपूर्वी…त्यावेळी आम्ही लहान होतो. मित्र एकमेकांना ट्वीट करत नाहीत का? काय टाईमपास सुरु आहे,” असं सांगत श्रेया घोषालने चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया घोषाल आणि पराग अग्रवाल हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे खास मित्र आहेत. पराग हा खाण्याचा आणि फिरण्याचा फार शौकीन आहे, असं श्रेयाचं म्हणणं आहे. यानिमित्ताने श्रेया घोषाल हिचे १० वर्षांपूर्वीचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. यात श्रेयाने तिची लहानपणाची मैत्री आणि पराग अग्रवालबद्दल सांगितले आहे. “आणखी एक बालपणीचा मित्र पराग अग्रवाल सापडला. खाद्यप्रेमी आणि प्रवासाची आवड असणारा. स्टॅनफोर्डचा हुशार विद्यार्थी. काल त्याचा वाढदिवस होता, कृपया त्याला शुभेच्छा द्या,” असे ट्वीट श्रेयाने केले होते. पराग अग्रवाल यांची ट्वीटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानतंर श्रेयाचे हे ट्वीट व्हायरल झाले.

विशेष म्हणजे पराग आणि श्रेया यांची मैत्री इतकी घट्ट आहे की, श्रेयाच्या लग्नसभारंभातही पराग सहभागी होता.

पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ झाल्याचं समजताच बातमी श्रेया घोषालनेही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन पराग, आम्हाला तुझा फार अभिमान वाटतो. हा आमच्यासाठी फार मोठा दिवस असून तो आम्ही साजरा करत आहोत,” अशा शब्दात श्रेयाने त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीमधून कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगमध्ये बॅचलर्स डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पराग यांनी अमेरिकेतील स्टॅण्डफोर्ड विद्यापिठामधून कंप्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पराग यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि याहू रिसर्च येथे महत्वाच्या पदांवर काम केलं. पराग २०११ पासून ट्विटर या कंपनीच्या सेवेत आहेत.

Story img Loader