चित्रपटसृष्टी सध्या कठीण काळातून जात आहे. बॉलिवूड असो की साऊथ चित्रपट, बॉक्स ऑफिसवर एकामागून फ्लॉप होताना दिसत आहेत. बॉलिवूड चित्रपटाच्या विरोधात सोशल मीडियावर सातत्याने बॉयकॉट ट्रेंड होताना दिसत आहे. चित्रपटाची घोषणा होताच युजर्सचा विरोध आणि बॉयकॉट ट्रेंड सुरू होतो. चित्रपटगृहांच्या रिकाम्या खुर्च्या आणि सोशल मीडियाची अवस्था पाहता लोक बॉलिवूडकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अभिनेता, दिग्दर्शक आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट श्रेयस तळपदेने चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच त्याने अर्जुन कपूर, आलिया भट्ट यांच्या बॉयकॉटबाबतच्या वक्तव्यावरही नाराजी व्यक्त केली आहे.

‘इक्बाल’ ते ‘कौन प्रवीण तांबे’ यांसारख्या चित्रपटांचा दमदार अभिनेता श्रेयस तळपदे याने ‘न्यूज १८ लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत बॉयकॉट ट्रेंडबद्दल भाष्य केलं. अर्जुन कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि आमिर खान यांना अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने ट्रोल केले गेले, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले त्याबद्दल श्रेयस तळपदेने चिंता व्यक्त केली. पण यादरम्यान, त्याने अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांसारख्या कलाकारांनी बॉयकॉटबाबत केलेल्या वक्तव्यांवरही आपलं मत व्यक्त केलं. या कलाकारांनी, “जर लोकांना ते आवडत नसेल तर आमचे चित्रपट पाहू नका.” अशा आशयाची वक्तव्य केली होती. याशिवाय करीना कपूरचा असाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
आणखी वाचा- “काहीच नकारात्मक नाही…” बॉयकॉट ‘ब्रह्मास्त्र’ ट्रेंडवर आलिया भट्टची प्रतिक्रिया

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

बॉलिवूड कलाकारांच्या अशा विधानांवर टीका करताना श्रेयस तळपदे म्हणाला, “सध्या इंडस्ट्रीत जी वक्तव्ये केली जात आहेत ती मला आवडत नाहीत. इंडस्ट्रीशी निगडित काही लोक यावेळी जे वक्तव्य करत आहेत त्यावरून मी खूशही नाही. आम्ही सर्व या क्षेत्रात काम करतो. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल बाप्पाचे आभार मानले पाहिजेत. अशा स्थितीत जी प्रकारची विधाने केली जात आहेत, ती मला आवडत नाहीत, ती चुकीची आहेत.

आणखी वाचा- …म्हणून श्रेयस तळपदे घरातील बाप्पाचे कधीही विसर्जन करत नाही, जाणून घ्या कारण

श्रेयस तळपदे आपला मुद्दा मांडताना पुढे म्हणाला, “तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल, तुमची गर्लफ्रेंड असेल आणि ती तुमच्यावर नाराज झाली असेल, रागावली असेल, तर तुम्ही तिला तुमच्या आयुष्यातून निघून जायला तर सांगत नाही ना? तुम्ही तिला थांबवता, त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करता. मला वाटतं प्रेक्षक आपल्या गर्लफ्रेंडसारखे आहेत. ते आपल्यावर रागावले असतील तर त्यांना पटवून देणे आपले कर्तव्य आहे. आपण त्यांना विचारले पाहिजे की काय झाले? का उदास आहात, आमच्याकडून काही चूक झाली असेल, आम्ही तुमचे मन दुखावले तर याबद्दल मला माफ करा.”

बॉयकॉट ट्रेंड आणि याबाबत कलाकारांच्या वक्तव्यांवर बोलताना श्रेयस तळपदे म्हणाला, “चित्रपटसृष्टीतील लोक काहीही म्हणतील, मी प्रेक्षकांना एकच सांगेन की तुम्ही आमचे काम पाहा. तुम्ही आमचे चित्रपट पाहा. OTT वर आमची सीरिज पाहा. जर प्रेक्षक आमचं काम पाहत नसतील तर आम्हा कलाकारांच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही.

Story img Loader