अभिनेता श्रेयस तळपदे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. एककीडे झी मराठीवरील त्याची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका गाजतेय. तर दुसरीकडे श्रेयस आगामी काळात वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आगामी काळात श्रेयस तळपदे अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात महत्त्वूर्ण भूमिकेत दिसणार असून तो या चित्रपटात राजकीय भूमिका साकरत आहे. नुकतंच या चित्रपटातील श्रेयस तळपदेचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. ज्याची सोशस मीडियावर जोरदार चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता चित्रपटातील आणखी एका भूमिकचा उलगडा करण्यात आला आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे दिसणार असल्याची चर्चा तर मागच्या बऱ्याच काळापासून सुरू होती. पण ही भूमिका कोणती याचा खुलासा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून झाला आहे. श्रेयस तळपदे ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

श्रेयस तळपदेनं त्याच्या इन्स्टाग्रामवर यासंबंधी पोस्ट केली असून या पोस्टमध्ये त्यानं नवं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरसोबत त्यानं अटलजींची एक कविता देखील शेअर केली आहे. श्रेयसनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, “बाधाएं आती हैं आएं, घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा। – अटलजी”

आणखी वाचा- ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेता घेणार तब्बल २१ दिवसांसाठी ब्रेक, कारण आले समोर

आपल्या पोस्टमध्ये श्रेयसने पुढे लिहिलं, “सर्वांचे लाडके नेते, दूरदर्शी, खरे देशभक्त आणि जनतेचा माणूस.. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांची भूमिका साकारण्याचा सन्मान मला मिळाला याचा आनंद आहे. आशा आहे की मी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन. गणपती बाप्पा मोरया” दरम्यान या चित्रपटाची निर्मिती कंगना रणौतनं केली असून ती स्वतःच या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade is in role of atal bihar vajpayee in film emergency kangana ranaut mrj