बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटामुळे चर्चेत असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने यंदाच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सलमान खानसोबत दिसणार आहे. याशिवाय श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अर्शद वारसी हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. पण आता असे म्हटले जात आहे की श्रेयस आणि अर्शदला (Arshad Warsi) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर त्या दोघांच्या जागी सलमानचा मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांची एण्ट्री झाली आहे. सलमान आणि आयुष पुन्हा एकत्र येण्याची ही दुसरी वेळ आहे. दोघेही या आधी अंतिम या चित्रपटात दिसले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, “कभी ईद कभी दिवालीसाठी श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसी यांच्या जागी सलमान खानने आयुष शर्मा आणि झहीर इक्बालला घेतले आहे. आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल आता सलमान खानसोबत फरहाद सामजीच्या चित्रपटात त्याच्या भावाची भूमिका साकारणार आहेत. पूजा हेगडे सलमानच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार व्यंकटेश महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

आणखी वाचा : “हे वैयक्तिक मत आहे…”, अक्षयच्या माफीनाम्यानंतर अजय देवगणने केलेले वक्तव्य चर्चेत

सूत्रानीं पुढे सांगितले की, “आधी आयुषने चित्रपटाला नकार दिला होता कारण हा रोल अंतिम चित्रपटातील त्याच्या भूमिके इतका मोठा नव्हता. पण त्यानंतर पुन्हा एकदा आयुषने चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली.” या चित्रपटात बॉलिवूड आणि दाक्षिणेतील कलाकार दिसणार आहेत.

आणखी वाचा : वयाच्या ७९ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांची हाय कीक पाहून; टायगर श्रॉफलाही फुटला घाम, म्हणाला…

या चित्रपटाशिवाय सलमान खान टायगर ३ मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २१ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानचाही कॅमिओ असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचीही चाहते आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade out of salman khans kabhi eid kabhi diwali aayush sharma replaced him dcp