झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे आणि मायरा वायकुळ हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेतील नेहा आणि परीची केमिस्ट्री प्रेक्षकांना हवीहवीशी वाटत आहे. मालिका सध्या एका रंजक वळणावर आली असून प्रेक्षकांनी पाहिलं कि यशची खरी ओळख आता सगळ्यांसमोर आली आहे.
यशने त्याची खरी ओळख लपवून ठेवल्यामुळे नेहा खूपच दुखावली आहे. पण दुसरीकडे यश नेहाला मनवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. नेहा त्याच्यासाठी टिफिन आणेल असा विश्वास यशला असतो पण ती त्याच्यासाठी टिफिन आणत नाही आणि स्वतःही जेवत नाही. यशला विश्वास वाटतो की अजूनही ती आपला विचार करते.
Video: ‘ही तर करोना पसरवते…’, कंगनाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
यश तिला लिफ्टमध्ये गाठून बोलायचा प्रयत्न करतो पण तिथेही बोलणं होत नाही. यशाची कॅम्पेन यशस्वी झाल्यामुळे सिम्मी सगळ्या ऑफिस स्टाफसाठी पार्टी अनाऊन्स करते. यश समीरवर जबाबदारी सोपवतो की काहीही झालं तरी नेहा पार्टीला आली पाहिजे. या पार्टीत सिम्मी यशासाठी काही नवीन अडचण निर्माण करणार का? यश नेहाशी पार्टीत बोलून तिला मनवू शकेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.