Pushpa 2 Shreyas Talpade Dubbing : सध्या सर्वत्र अल्लू अर्जुनाचा नवा सिनेमा ‘पुष्पा २’ची चर्चा आहे. ‘पुष्पा २’ हा २०२१ मध्ये आलेल्या ‘पुष्पा द राईज’ या सिनेमाचा सिक्वेल असून हा सिनेमा येत्या ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुष्पाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुनने ‘झुकेगा नही साला’ म्हणत बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. पहिल्या भागातील ‘पुष्पा फ्लॉवर नही फायर है’, ‘झुकेगा नही साला’ अशा जबरदस्त डायलॉग्जने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. खर तर पुष्पाचा हिंदी डब सिनेमा हा अल्लू अर्जुनच्या अभिनयाबरोबरच त्याच्या हिंदी डब आवाजामुळे चालला होता. हा आवाज एका मराठी माणसाचा होता.

मूळ तेलुगूमधील या चित्रपटाला हिंदीमध्ये प्रदर्शित करताना अल्लू अर्जुनच्या पात्राला मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला. जेवढी चर्चा अल्लू अर्जुनची झाली तेवढीच चर्चा श्रेयस तळपदेच्या आवाजाची झाली. आता पुष्पाच्या दुसऱ्या भागातही अल्लू अर्जुनला श्रेयस तळपदेने आवाज दिला असून त्याने या दुसऱ्या चित्रपटासाठी डबिंग करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल

हेही वाचा…Video : अल्लू अर्जुनचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्याने मुंबईकरांशी साधला मराठीत संवाद, म्हणाला…

या व्हिडीओमध्ये एका बाजूला ट्रेलर सुरू असून दुसऱ्या बाजूला ट्रेलरमधील अल्लू अर्जुनचे डायलॉग श्रेयस तळपदेने कसे म्हटले ते दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला श्रेयस व्हॅनिटी व्हॅनमधून उतरतो आणि ‘पुष्पाचा आवाज श्रेयस तळपदे’ असे शीर्षक दिसते. श्रेयस तळपदे डबिंग करण्यासाठी जसा चालत जातो, तशीच त्याच व्हिडीओत अल्लू अर्जुनची ट्रेलरमधील एंट्री दाखवली आहे. यानंतर श्रेयस तळपदे अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ च्या पोस्टरजवळ जाऊन दाढीवरून हात फिरवत पुष्पाची आयकॉनिक ॲक्शन करतो.

पाहा श्रेयस तळपदेने शेअर केलेला व्हिडीओ –

p

व्हिडीओत ट्रेलर जसा पुढे जातो, तसे पुष्पाचे डायलॉग्स येतात आणि एका बाजूला ट्रेलरमधील डायलॉग्स सुरू असताना ज्या आवेगात अल्लू अर्जुन डायलॉग्स म्हणतो त्याच आवेगात डायलॉग्स म्हणत तसा आवाज काढण्यासाठी श्रेयस तळपदेने केलेले प्रयत्न दिसतात. ‘पुष्पा नॅशनल नही इंटरनॅशनल खिलाडी है’, ‘ पुष्पा फायर नही वाईल्ड फायर है’ हे या भागातील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले डायलॉग श्रेयसने डबिंगच्या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. श्रेयसच्या एका चाहत्याने “Wild Fire अरे आवाज कुणाचा!!!!! आपल्या मराठी माणसाचा” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा…Pushpa 2 : चित्रपटातील धमाकेदार गाणं प्रदर्शित, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा Peelings वर एनर्जेटीक डान्स

श्रेयसने हा व्हिडीओ शेअर करताना अल्लू अर्जुनचे कौतुक करत त्याला ही संधी देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. श्रेयसने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ‘फ्लॉवर नाही, फायर आहे मी’पासून ‘नॅशनल नाही, इंटरनॅशनल आहे मी!’पर्यंत आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे. ‘पुष्पा २’ चा आठवडा अधिकृतपणे सुरू झाला आहे आणि मी यासाठी खूप उत्सुक आहे! ‘पुष्पा २’ साठी पुन्हा डबिंग करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे आणि माझ्या आवाजाला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुष्पाराज म्हणजेच अल्लू अर्जुन यांच्याबद्दल बोलायचं तर… काय एनर्जी आहे यार! तुमचा दमदार अभिनय प्रत्येक वेळी मला डब करताना नवीन ऊर्जा देतो. तुमचा स्वॅग, तुमचा आत्मविश्वास, तुमची देहबोली हे सर्व प्रेरणादायी आहे.

हेही वाचा…‘पुष्पा २’ अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ठरला ‘वाईल्ड फायर’, दिल्लीत १८०० तर मुंबईत तब्बल ‘इतक्या’ रुपयांना होतेय तिकीट विक्री

पुढे श्रेयस म्हणाला, मनव भाऊ, राज, वीरू, सनी आणि संपूर्ण डबिंग टीमचे खूप खूप आभार, ज्यांनी ही प्रक्रिया आनंददायक, मजेदार आणि उत्साही बनवली. तुमचं मेहनतीचं फळ स्क्रीनवर स्पष्टपणे दिसतंय. आता तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहून तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा!