गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी ‘पुष्पा’ हा ब्लॉगबस्टर चित्रपट प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या. प्रदर्शनाच्या आधीपासूनच हा चित्रपट तुफान चर्चेत होता. तसंच हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याने अनेक रेकॉर्ड्स मोडले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. या चित्रपटाचे सगळेच शो सर्वत्र हाऊसफुल होत होते. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यानेही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता नुकतंच या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने श्रेयसने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयस तळपदे याने अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पाराज’ या व्यक्तिरेखायला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला होता. त्याने दिलेला आवाज सर्वांना खूप आवडला. त्याच्या कामगिरीसाठी सर्वांनीच त्याचं भरभरून कौतुक केलं. अल्लू अर्जुन यानेही त्याचं हे काम आवडल्याचं जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं. या चित्रपटामुळे श्रेयसला एक वेगळी ओळख मिळाली. आता या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे श्रेयसने या चित्रपटाबद्दलच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा : गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू…शाहनवाजशी लग्नगाठ बांधल्यावर देवोलिना भट्टाचार्जीची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी

श्रेयसने त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत तो अगदी डॅशिंग अंदाज दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिलं, “‘पुष्पा’ प्रदर्शित होऊन एक वर्ष झालंही! ही गोष्ट मला काल घडल्यासारखी वाटत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटासाठी मी दिलेल्या आवाजासाठी माझं कौतुक करणारे असंख्य फोन, मेसेज, ट्विट्स, रील्स आले. मला ही संधी मिळाल्याबद्दल मी सर्वांचा खूप आभारी आहे. ‘पुष्पा’ची क्रेझ आजही तशीच आहे ही गोष्ट खूप भारावून टाकणारी आहे. सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद. पुष्पा… पुष्पाराज… झुकेगा नहीं साला.”

हेही वाचा : “पुष्पानंतर आता…” अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा मुलाखतीदरम्यान खुलासा

दरम्यान आता लवकरच ‘पुष्पा’चा पुढील भाग ‘पुष्पा २’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. रश्मिका मंदाना हिनेही चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना शूटिंग सुरू झाल्याची बातमी दिली होती. हा दुसरा भाग पुढील वर्षी प्रदर्शित होईल असं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade shared special post to celebrate one year of pushpa film rnv