गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्यांची रील्स आणि डायलॉग्स व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात अनेक चाहत्यांना हिंदी डब चित्रपट पाहिल्यानंतर पुष्पा ही भूमिका मराठी असल्याचे पाहून प्रचंड आनंद झाला होता. हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. आता श्रेयसने ही भूमिका मराठमोळी कशी झाली या विषयी एका मुलाखतीत सांगितले आहे.

श्रेयसने एबीपी माझाला नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत श्रेयसने पुष्पा या भूमिकेविषयी म्हणाला, “आमचे डबिंग डिरेक्टर म्हणाले की आपण याला थोडा मराठी तडका देईया का? डायलॉग्समध्ये कुठे तरी एखादा मराठी शब्द घेऊ या का? यावरून असं दाखवता येईल की तो महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या बॉर्डरवर राहणारा आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न आपण करू या का?”

आणखी वाचा : ‘त्या’ दृश्यांवरून अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी!

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

पुढे तो म्हणाला, “आम्ही डब करायला सुरुवात केली. पहिलाच सीन होता. तो त्याच्या पायावर पाय ठेवून बसला आहे आणि तो बोलतो ये भी मेरा पैर है और ये भी मेरा पैर है…आला मोठा शहाणा आम्ही त्यात हे वापरलं. त्यावर डबिंग डिरेक्टर म्हणाले की चांगलं वाटतयं, पण ते म्हणाले की तुम्ही याला इतका मराठी तडका देत आहात, तर हे चांगलं वाटेल का? मी त्यांना म्हणालो तुम्ही हे पूर्ण ऐका आणि जेव्हा तुम्ही हे पूर्ण एकत्र पाहाल तर तुम्हाला नक्कीच आवडणार. त्यानंतर आम्ही त्यात शब्द वापरायला लागलो कावरा बावरा, आईच्या गावात वगैरे जे चिडून एखाद्या व्यक्ती बोलतो ते सगळे, हे सगळे शब्द मराठी प्रेक्षकांना आपलेसे वाटले, याचा मला आनंद आहे. सुरुवातीला सुद्धा तो बोलतो काय साहेब कसं काय? मस्त मस्त. एवढचं काय तर मी मराठी आहे म्हणून ती भाषा ओढून तोडून बोलण्याची गरज नव्हती आणि मी मराठी असल्याने या भाषेचा वापर करायला मला नेहमीच आवडतं.

Story img Loader