मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून काम करून स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर. आतापर्यंत ती मराठी,हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध कलाकृतींमध्ये झळकली. या तिच्या संपूर्ण करिअरमध्ये तिला तिच्या आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा मिळाला. श्रिया लहान असताना सचिन आणि सुप्रिया यांनी तिचं संगोपन कसं केलं याबद्दल आता श्रियाने भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रिया पिळगावकर ही सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे. त्यामुळे तिला लहानपणापासूनच तिला अभिनयाचं, कलेचं वातावरण अनुभवायला मिळालं आहे. श्रिया लहान असताना सचिन आणि सुप्रिया पिळगावकर करिअरच्या शिखरावर पोहोचले होते. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट होत होते. पण तसं जरी असलं तरीही त्यांनी लेकीच्या संगोपनामध्ये कसलीही कसर सोडली नाही.

आणखी वाचा : “त्या काळी आमच्यात स्पर्धा होती पण…,” सचिन पिळगांवकरांनी उलगडलं महेश कोठारेंबरोबरचं नातं

याबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रिया म्हणाली, “माझं संगोपन माझ्या आई-बाबांनी सर्वसाधारणच केलं आहे. मी सर्वसामान्य आयुष्य जगत आले आहे. माझं बालपण स्विमिंग आणि क्रीडाक्षेत्रात गेलं. लहानपणापासूनच मला अभ्यास करायला आवडायचा. मी जेव्हा अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या आईला खूप आश्चर्य वाटलं होतं. आई आणि बाबा त्यांच्या कामात व्यग्र असले तरीही मला खूप वेळ द्यायचे. ते माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात माझ्याबरोबर होते.”

हेही वाचा : “‘तू-तू मैं-मैं’ मालिकेच्या दुसऱ्या भागात सुनेच्या भूमिकेत कोण दिसणार? खुलासा करत सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या…

पुढे ती म्हणाली, “आईने काम करता करता घरही सांभाळलं, तर बाबांनी ही माझ्याकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. माझा पालकांबरोबरचा तो टच कायम तसाच होता. माझे आई-बाबा सेलिब्रेटी आहेत हे मला माहित होतं. पण शेवटी इथे माझे आई-बाबा आहेत हे माझ्या डोक्यात स्पष्ट होतं. मी लहान होते तेव्हा बाबा मला रोज नवीन गोष्टी सांगायचे. तेव्हापासूनच माझ्यात सृजनशीलतेचं बीज रोवलं गेलं.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shriya pilgaonkar revealed how sachin pilgaonkar and supriya pilgaonkar raise their daughter rnv