दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. श्रियाने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत श्रियाने ती आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मात्र, श्रियाच्या मुलीचा जन्म गेल्या वर्षी झाला आहे. २०२० मध्ये श्रिया आई झाली आहे.
श्रियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला श्रियाचा पती आंद्रेई कोस्चिव दिसत आहे. आंद्रेईच्या हातात कप आहे आणि श्रिया ही तिच्या मुलीला कडेवर घेऊन खेळत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर आंद्रेई त्यांच्या मुलीजवळ जातो. शेवटी व्हिडीओत २०२० मध्ये गर्भवती असतानाचे श्रियाचे बेबीबंप मधील फोटो दिसत आहेत. सगळ्यांना “हॅलो, २०२० चा क्वारंटाईन वेळ आमच्यासाठी अप्रतिम होता. एकीकडे संपूर्ण जगात सगळ्या गोष्टी वर-खाली होत होत्या तर, दुसरीकडे आमचे आयुष्य संपूर्णपणे बदलले होते. आमचे आयुष्य हे रोमांच, उत्साहाने परिपूर्ण झाले होते. आमच्या जीवनात एक देवदूत एक परी आम्हाला आशीर्वाद म्हणून भेटली. आम्ही देवाचे आभारी आहोत!”, अशा आशयाचे कॅप्शन श्रियाने दिले आहे.
तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी श्रियाला शुभेच्छा देत प्रश्न देखील केला आहे. “मॅडम तू प्रेग्नेंट कधी होतीस?” दुसरा नेटकरी म्हणाला, “अभिनंदन, पण ही बातमी ऐकून धक्का बसला आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “ती गर्भवती होती आणि तिने मुलीला जन्म दिला हे एकूण फक्त मलाच धक्का बसला की सगळ्यांना.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “तू कधीच सांगितले नाही…तुझ्या फोटोंकडून पाहून देखील आम्हाला कळाले नाही…अभिनंदन,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी श्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : रकुल प्रीत सिंगने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली
आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल
श्रियाने बॉयफ्रेंड आंद्रेई कोस्तिवशी १२ मार्च २०१८ मध्ये लग्न केले. त्यांचे लग्न राजस्थानमध्ये जवळच्या लोकांच्या उपस्थितीत झाले. श्रिया ऑगस्ट महिन्यात बार्सिलोना सोडून पुन्हा एकदा भारतात परतली आहेय आंद्रेई कोस्चिव हा राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू असण्यासोबत तो एक व्यापारी आहे. मॉस्कोमध्ये त्याची स्वतःचे रेस्टॉरंट चेन देखील आहे.