२००१ ते २००५ या पाच वर्षांच्या काळामध्ये प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. एक आदर्श एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं हे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यातच शलाका टिपरे ही भूमिका साकारणारी रेश्मा नाईक ही अभिनेत्री प्रेक्षकांना विशेष भावली. मात्र या मालिकनेनंतर ती फार कमी वेळा प्रेक्षकांसमोर आली. त्यामुळे सध्या ती काय करते? किंवा कशी दिसते? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुटुंबावर आधारित या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी गंगाधर टिपरे यांची भूमिका साकारली होती. तर अभिनेता राजन भिसे आणि अभिनेत्री शुभांगी गोखले हे त्यांच्या मुलगा आणि सुनेच्या भूमिकेत दिसले होते. तर विकास कदमने (शिऱ्या) त्यांच्या नातवाची तर, रेश्मा नाईकने नातीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या मालिकेतील हे सर्वच कलाकार पुढे मराठी कला क्षेत्रात आपापले नाव गाजवताना दिसले. परंतु, रेश्मा नाईक या क्षेत्रापासून थोडी अलिप्त असल्याचं दिसून आलं. मात्र कलाविश्वापासून दूर असलेली रेश्मा आताही तितकीच सुंदर आणि गोड दिसत असल्याचं पाहायला मिळालं.


मूळ पुण्याची असलेल्या रेश्माचा जन्म २१ ऑगस्ट रोजी झाला असून तिचं संपूर्ण शिक्षणही पुण्यातच झालं आहे. रेश्माचे लग्न झाले असून तिला एक मुलगाही आहे. लग्नानंतरचे तिचे नाव रेश्मा किनारे असे आहे. लग्नानंतर ती सहकूटूंब भारताबाहेर स्थायिक झाली. त्यामुळे तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.