प्रेक्षकांना भुरळ घालणारी २००१ मधील ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. एक आदर्श, एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं हे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. कुटुंबावर आधारित या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी गंगाधर टिपरे यांची भूमिका साकारली होती. तर अभिनेता राजन भिसे आणि अभिनेत्री शुभांगी गोखले हे त्यांच्या मुलगा आणि सुनेच्या भूमिकेत दिसले होते. तर विकास कदमने (शिऱ्या) त्यांच्या नातवाची तर, रेश्मा नाईकने(शलाका) नातीची भूमिका साकारली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकंदरीतच हे कुटुंब आपल्या आसपासचे वाटावे इतके खरे, मनाला भावणारे. आपले विश्व विसरायला लावून आपण अगदी त्यांच्यात सामावून जातो इतके अप्रतिम कलाकृती. दिलीप प्रभावळकरांच्या अनुदिनी या संग्रहावर तयार केलेली ही मालिका अजरामर ठरली.

आणखी वाचा : ‘रामायण’ आता मराठीत; या तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी ही मालिका झी मराठीवर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विनोद हे किती सहज असतात, हे या मालिकेतून समजतं आणि आता त्याच विनोदांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटणार आहे. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका १५ जून पासून संध्याकाळी ७.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.