अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हासन. श्रुती दाक्षिणात्य सुपरस्टार आणि नेते कमल हासन व सारिका यांची मुलगी आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आता एका यूजरने श्रुतीला तिच्या ब्रेकअप बद्दल विचारले आहे. त्यावर श्रुती देखील शांत बसली नाही तिने यूजरला चांगलेच सुनावले असून मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे.
श्रुतीने नुकताच इन्स्टाग्रामवरील Ask me anythingच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका यूजरने ‘तुझे आतापर्यंत किती ब्रेकअप झाले आहेत?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देत श्रुती म्हणाली, ‘तुझ्या आतापर्यंत किती गर्लफ्रेंड्स होत्या? मला असे वाटतय एकही नाही.’ या सोबतच तिने हसतानाचा फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : तू जे करत आहेस हे बरोबर आहे की चुकीचे…; अल्लू अर्जुनने समांथासाठी केलेले वक्तव्य चर्चेत

सध्या श्रुती शांतनू हजारीकाला डेट करत आहे. गेल्याच महिन्यात तिने मंदिरा बेदीचा टॉक शो ‘द लव्ह लाफ लिव्ह’मध्ये प्रेमाची कबुली दिली होती. त्यावेळी तिला शांतनूसोबत असलेले नाते इतरांपासून लपवायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत की म्हणाली, ‘मी भूतकाळात अनेक गोष्टी लपवल्या आहेत. मी प्रत्येक वेळी सिंगल आहे असे सांगायचे. पण मी हे कुणासाठी करते असा प्रश्न मला पडायचा.’