shruti-akshara-haasan-450कमल हसनची मोठी मुलगी श्रुती हसन बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोडीला गायनाची वाटदेखील चोखाळत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘तेवर’ चित्रपटातील ‘जोगनिया’ आणि ‘मॅडमिया’ या दोन गाण्यांसाठी तिने आपला आवाज दिला आहे. यातील ‘मॅडमिया’ गाणे तर तिच्यावर शूट करण्यात आले आहे. श्रुतीची लहान बहिण अक्षरा हसन ‘शमिताभ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. श्रुतीने आपल्या धाकट्या बहिणीसाठी गाणे गायल्याचे समजते. ‘शमिताभ’ चित्रपटातील ‘सन्नाटा’ हे गाणे तिने गायले असून, इंटरनेटवर हे गाणे उपलब्ध आहे. ‘तेवर’ चित्रपटातील ‘जोगनिया’ गाण्याला मिळालेला चांगला प्रतिसाद लक्षात घेत श्रुतीला ‘शमिताभ’ चित्रपटातील ‘सन्नाटा’ गाणे गाण्यासाठी करारबद्ध करण्यात आले. असे असले तरी, इलायाराजांनी संगीतबद्ध केलेले ‘सन्नाटा’ गाणे ‘जोगनिया’ गाण्यापेक्षा खूप वेगळे असून, हे तरुणांचे गाणे आहे. या गाण्याचे जे बोल आहेत, त्यात अनेक गायक, गीतकार, कलाकार आणि संगीतकार अशा साऱ्यांची नावे येतात. ज्यामुळे हे गाणे अधिकच मनोरंजक बनते. आर. बाल्की दिग्दर्शित ‘शमिताभ’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धनुषच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader