स्टार किड्स सध्या त्यांच्या आई- बाबांपेक्षा जास्त चर्चेत आले आहेत. आता श्रुती हसनचंच घ्या ना… ती कमल हसनची मुलगी अशी तिची ओळख असली तरी ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली एक नावाजलेली अभिनेत्रीही आहे. तिला पाहिल्यावर ती अगदी आपल्या आईसारखी म्हणजे सारिका ठाकूरसारखीच दिसते हे कोणीही मान्य करेल. पण सध्या श्रुती तिच्या आगामी सिनेमांमुळे किंवा आई- बाबांमुळे चर्चेत नाहीये तर ती चर्चेत असण्याचं कारण थोडं वेगळं आहे. हल्ली श्रुती तिचा कथित ब्रिटीश प्रियकर मायकल कोरासलसोबत अनेक सार्वजनिक ठिकाणी दिसते. हे दोघंही एकमेकांना गेल्या नऊ महिन्यांपासून ओळखत असल्याचे म्हटले जाते.

‘टायगर जिंदा है’च्या रॅपअप पार्टीमध्ये दिसले सलमान आणि कतरिना

मायकल स्वतः एक ब्रिटीश अभिनेता असून लंडनमधील अनेक थिएटर्स कंपन्यांसोबत तो काम करतो. मायकल, श्रुतीची फार काळजी घेतो. आता या फोटोंमध्येही हे दोघं हातात हात घेऊन चालताना दिसत आहेत. याआधी प्रसारमाध्यमांसमोर मायकल येऊ नये याची काळजी श्रुती घेत होती. पण यावेळी हे दोघंही स्वतःहून प्रसारमाध्यमांना फोटो देत होते. त्यामुळे श्रुतीने त्यांचे हे नाते सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला की काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. या दोघांसोबत अभिनेता विद्युत जामवालही होता. या तिघांमध्ये चांगली मैत्री असल्याचे यावरुन तरी दिसते.

‘गली बॉय’ स्टार रणवीर- आलियाचा रॅम्प जलवा

काही दिवसांपूर्वी, मायकल खास श्रुतीला भेटण्यासाठी आणि तिला विमानतळावर सोडण्यासाठी आला होता. तिला या बाबतीत विचारले असता ती म्हणाली की, मी अशा बातम्यांवर विश्वास ठेवत नाही आणि या बातम्यांवर काही टिपणीही देऊ इच्छित नाही. या सर्व अफवा आहेत असं म्हणत ती म्हणाली की, मी अशा अफवांकडे दुर्लक्ष करते कारण मला माझं खासगी आयुष्य सर्वांसमोर आणायला आवडत नाही.

श्रुती आणि मायकल यांची पहिली भेट लंडनमध्ये झालेली. त्यावेळी श्रुती एका ब्रिटीश रॉक बॅण्डसोबत एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी लंडनला गेली होती. असं म्हटलं जातं की, दोघांनी पहिल्याच भेटीत एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले होते. यानंतर त्यांच्या भेटी वाढतच गेल्या.

Story img Loader