पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या #selfiewithdaughter या सेल्फी उपक्रमावर टि्वटरच्या माध्यमातून आपले मतप्रदर्शन केल्याने अभिनेत्री श्रुती सेठ आज टि्वटरवर चर्चेचा विषय बनली. पंतप्रधानांचे सेल्फी प्रेम सर्वश्रुत आहे. त्याबाबत अनेकवेळा लोकांमध्ये चर्चा होतानादेखील आढळून येते. अलिकडेच योगदिनाच्या दिवशी सेल्फीला नकार देताना मोदींना पाहण्यात आले. तर, आपल्या मुलीसोबतचा सेल्फी #selfiewithdaughter या हॅशटॅगसह टि्वटरवर पोस्ट करण्याचे आवाहन मोदींनी ‘मनकी बात’द्वारे भारतीय जनतेला केले आहे. मोदींच्या या उपक्रमाविरुद्ध श्रुतीने टिवटरवर आवाज उठवून टि्वटरकरांचा रोष ओढवून घेतला. तर काहींनी तिच्या या भूमिकेचे समर्थन केले. #selfieobsessedPM ह्या हॅशटॅगद्वारे श्रुतीने पंतप्रधानांच्या सदर भूमिकेवर टीका करताच या सर्व प्रकाराला सुरुवात झाली. ‘शरारत’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘बाल वीर’ इत्यादी मालिकांमध्ये श्रुतीचे दर्शन झाले आहे.
पंतप्रधानांच्या #selfiewithdaughter वर टीका करून श्रुतीने ओढवून घेतला टि्वटरकरांचा रोष
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या #selfiewithdaughter या सेल्फी उपक्रमावर टि्वटरच्या माध्यमातून आपले मतप्रदर्शन केल्याने अभिनेत्री श्रुती सेठ आज टि्वटरवर चर्चेचा विषय बनली.
First published on: 29-06-2015 at 07:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shruti seth trolled on twitter for comments on pm narendra modis selfie with daughter