साऊथची प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रुती षणमुग प्रिया हिच्या पतीचे आकस्मिक निधन झाले आहे. अरविंद शेखरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर येत आहे. अरविंदचे २ ऑगस्ट रोजी निधन झाले. ३० वर्षीय अरविंद बॉडीबिल्डर होता आणि या जोडप्याचे मे २०२२ मध्ये लग्न झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनीलने खरेदी केली आलिशान कार, पाहा व्हिडीओ

अरविंद शेखर हा व्यवसायाने बॉडीबिल्डर व फिटनेस ट्रेनर होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद शेखरला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. अरविंदने गेल्या वर्षी झालेल्या मिस्टर तामिळनाडू २०२२ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. या जोडप्याने मे महिन्यात त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा केला होता.

“मी आईसाठी ब्रा विकत घ्यायला जातो”, करण जोहरचा खुलासा; म्हणाला, “माझे काही मित्र…”

अरविंदच्या निधनानंतर श्रुतीने पोस्ट शेअर केली आहे. “तू फक्त शरीराने दूर गेला आहेस, पण तुझा आत्मा आणि मन माझ्या सभोवताली आहे आणि सदैव माझे रक्षण करते! माझे तुझ्यावरचे प्रेम आता अधिकाधिक वाढत आहे. आपल्या एकमेकांसोबतच्या खूप आठवणी आहेत ज्या मी आयुष्यभर जपत राहीन. मला तुझी आठवण येते आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते अरविंद,” असं श्रृतीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिने अरविंदबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे.

श्रुती षणमुग प्रिया आणि अरविंद शेखर यांचे मे २०२२ मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या लग्नात अभिनेत्री आणि तिच्या पतीच्या कुटुंबासह अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली होती. अरविंदच्या अचानक निधनाने श्रुतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात तिला तिचे कुटुंब, इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी धीर देत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shruti shanmuga priya husband arvind shekar passed away due to heart attack hrc