बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही इंडस्ट्रीतील अशा कलाकारांपैकी एक आहे, जे अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले आहेत. आपल्या चित्रपट आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी सारा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा एक फोटो समोर आला होता. हा फोटो समोर येताच तिच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या फोटोमध्ये अभिनेत्री भारतीय क्रिकेटर शुबमन गिलसोबत दिसत होती. हा फोटो समोर येताच सोशल मीडियावर दोघांच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आलं होतं.
सारा अली खानने किंवा शुबमन गिलने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता सोशल मीडियावर शुबमनच्या मित्राची एक पोस्ट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या पोस्टच्या माध्यमातून क्रिकेटरच्या मित्राने सारा आणि त्यांच्या नात्याबद्दल एक मोठा इशारा दिला आहे असं बोललं जात आहे. यानंतर आता सारा- शुबमनच्या डेटींगच्या चर्चा आणखीनच वाढल्या आहेत. ८ सप्टेंबरला शुभमन गिलचा मित्र खुशप्रीत सिंग औलखने शुबमनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती.
आणखी वाचा- सारा तेंडुलकर नाही तर सारा अली खानला डेट करतोय शुबमन गिल? फोटो होतोय व्हायरल
खुशप्रीत सिंग औलखने या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्वांना त्रास देणारा आणि गुगल ग्रॅज्युएट झाले बाळ. पण खरे सांगायचे तर तू नसतास तर माझं आयुष्य खराब झालं असतं. देव तुला खूप यश, कारणं, गुगलचं ज्ञान आणि सर्वांचे भरपूर प्रेम देवो (बहुत सारा प्यार).” शुभमनच्या मित्राने केलेल्या या पोस्टमध्ये त्याने साराला हटके पद्धतीने हायलाइट केल्याचं बोललं जात आहे. अर्थात काही वेळानंतर त्याने ही पोस्ट डिलिट केली असली तरीही त्याचे स्क्रिनशॉट मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. आता युजर्स या पोस्टचा संदर्भ अभिनेत्री सारा अली खानशी जोडत आहेत. ही पोस्ट समोर येताच चाहत्यांमध्ये आता सारा आणि शुभमनच्या नातं झाल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा- “एवढा अहंकार चांगला नाही…” व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी शहनाझ गिलला सुनावलं
एकीकडे शुबमनचं नाव सारा अली खानशी जोडलं जात आहे तर दुसरीकडे या पोस्टमध्ये हायलाइट केलेली सारा ही सारा अली खान नसून सारा तेंडुलकर आहे असं काही चाहत्यांचं म्हणणं आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच शुबमन आणि सारा तेंडुलकरच्या ब्रेकअपचं वृत्त समोर आलं होतं. एवढेच नाही तर दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. सारा अली खान आणि शुबमन गिलच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे, हे वेळ आल्यावर कळेल, पण पुन्हा एकदा सारा अली खान आणि शुभमनच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.