भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल सध्या त्याच्या आयपीएलमधील कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या गिलने देशभरातील लोकांची मने जिंकली आहे. क्रिकेटबरोबर शुबमनचे वैयक्तिक आयुष्य सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. नेटकरी कधी त्याचे नाव सारा तेंडुलकर, तर कधी सारा अली खानबरोबर जोडतात, परंतु या दोघींनीही शुबमनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. दरम्यान, आता शुबमनचा वेगळ्याच मुलीबरोबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’नंतर लवकरच येणार ‘रामशेज’; ऐतिहासिक चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष

udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Mohammed Siraj Zanai Bhosle Affair Asha Bhosle Granddaughter Breaks Silence on Relationship Rumours with Instagram Story
Mohammed Siraj Zanai Bhosle: मोहम्मद सिराज व आशा भोसलेंची नात खरंच एकमेकांना डेट करतायत? जनाईने फोटो पोस्ट करत केला खुलासा
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…

शुबमनने अलीकडेच सोशल मीडिया इन्फ्लुएंअर निहारिका एनएमच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये निहारिका आणि शुबमन अनेक मनोरंजक विषयांवर बोलताना दिसत आहेत. यानंतर निहारिकाने अलीकडेच शुबमनला फुलं देताना त्याच्याकडे पाहत रोमॅंटिक फोटो शेअर केले होते. निहारिकाने शेअर केलेल्या फोटोंनी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : Video : “थोडीसी जो पी ली है…” आमिर खानच्या घरी रंगली कपिल शर्माची मैफिल, पाहा व्हिडीओ

निहारिका-शुबमनचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका युजरने यावर “साराला टेन्शन आले असेल”, तर दुसऱ्या एका युजरने “सारा वहिनी बघा काय सुरु आहे…” अशा प्रतिक्रिया निहारिकाच्या पोस्टवर केल्या आहेत. निहारिकाने गिलबरोबरच्या फोटोंना “ही आमची डेट आहे की, मॅजिक शो” असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा : विकी कौशलच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे बदलले पंजाबी गायकाचे आयुष्य, रातोरात झाला स्टार

दरम्यान, सध्या शुबमन गिल ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी लंडनमध्ये आहे. गिल आयपीएल २०२३ च्या हंगामाचा ऑरेंज कॅप विजेता ठरला असून, त्याने आयपीएल २०२३ च्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. शुबमन गिलने १७ सामन्यात ५९.३३च्या सरासरीने ८९० धावा केल्या. तसेच या संपूर्ण हंगामात गिलने तीनवेळा शतक झळकावले आहे.

Story img Loader