रहस्य, रोमांचक आणि सामाजिक उपहासात्मक असलेला शटर सिनेमा ३ जुलैला होणार सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मल्याळम भाषेत ब्लॉक बस्टर ठरलेल्या या सिनेमाचा मराठीत अधिकृत असा हा रिमेक आहे. या सिनेमासाठी अभिनेते सचिन खेडेकरआणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे. त्यांना एकत्र पाहण्याची संधी देखील प्रेक्षकांना मिळणारआहे सिलिकॉन मिडिया ट्रेंड्स अॅडफिल्म मेकर्स प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा म्युझिक लॉंच सोहळा नुकताच पारपडला. या सोहळ्याला मराठी सिने सृष्टीतील अनेक दिग्गज, मान्यवर मंडळी तसेच शटर सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. मंगेशकांगणे आणि अश्विनी शेंडे यांनी सिनेमाची हृदयस्पर्शी गीते लिहिली असून पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. रोहितराऊतने आपल्या गस्ट या बॅंडसोबत सिनेमात परफॉर्मन्स दिला आहे. दिग्गज अॅड फिल्म मेकर, अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कारविजेते दिग्दर्शक व्ही . के. प्रकाश (व्हीकेपी) मल्याळम, कन्नड तेलुगु, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपटबनवल्यानंतर शटर या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे या सिनेमाच्यानिमित्ताने दक्षिणेतले अनेक तंत्रज्ञही मराठीत पहिल्यांदाच काम करीत आहेत. कोणत्याही सेटशिवाय एकाच वेळी फक्त दोन कॅमेरेवापरून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. शटर हा सिनेमा एका मध्यमवयीन व्यक्तीची कथा आहे. चार व्यक्तींबरोबर २४तासांत घडलेल्या अनपेक्षित घटनांचे चित्रिकरण सिनेमात करण्यात आले आहे. अमेय वाघ, प्रकाश बरे, राधिका हर्षे, कमलेशसावंत,जयवंत वाडकर,कौमुदी वाळोकर हे कलाकारही आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहेत. संजीव एमपी आणि प्रकाश बरेयांनी या सिनेमाची निर्मिती केली असून पटकथा आणि संवाद मनिषा कोरडे यांनी लिहिले आहेत. के. के. मनोज यांनी सिनेमाच्याछायाचित्रीकरण केले असून भक्ती मायाळू यांनी संकलन केले आहे. रहस्य, रोमांच, सामाजिक उपहास अशी बांधणी असलेला शटर हासिनेमा ३ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
रोमांचकारी ‘शटर’चा धमाकेदार म्युझिक लॉंच सोहळा
रहस्य, रोमांचक आणि सामाजिक उपहासात्मक असलेला शटर सिनेमा ३ जुलैला होणार सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मल्याळम भाषेत ब्लॉक बस्टर ठरलेल्या या सिनेमाचा मराठीत अधिकृत असा हा रिमेक आहे.
First published on: 27-06-2015 at 02:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shutter music launch