देशातील उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानीचे नुकतेच लग्न झाले. अनमोलने क्रिशा शाहसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नात अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अनिल आणि टीना अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात बच्चन कुटुंबाने हजेरी लावली होती. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

हे फोटो नव्या नवेली नंदा आणि श्वेता बच्चनने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. श्वेताने टीना अंबानी आणि आई जया बच्चनसोबतचा हळदी आणि मेहंदी कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. तर पुढे नव्याने शेअर केलेल्या नव्या, तिची आई श्वेता आणि आजी जया बच्चन दिसत आहेत. या एका फोटोत तिन पिढ्या पाहायला मिळत आहेत. या फोटोमध्ये त्या तिघी सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत नव्याने “तू मी आणि दुपरी” असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

आणखी वाचा : “I love myself but…”, रितेशन शेअर केला जिनिलियासोबतचा रोमँटिक व्हिडीओ

आणखी वाचा : “सोनू तू बहुत बदल गई रे”, भिडे मास्तरांच्या मुलीचा हॉट फोटो व्हायरल

अनमोल अंबानी आणि क्रिशा बद्दल बोलायचे झाले. तर, दोघांची भेट एका कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबाने करून दिली होती. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कुटुंबाने सगळ्यात आधी अनमोल अंबानी आणि क्रिशा शाह यांची ओळख करून दिली आणि नंतर दोघांनी एकमेकांना जाणून घेण्यास वेळ दिला.

Story img Loader