बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही बॉलिवूडपासून दूर आहे मात्र ती सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. काही दिवसांपूर्वीच नव्यानं तिच्या कुटुंबीयांबाबत काही धक्कादायक खुलासे केले होते. आपल्या कुटुंबात मुला- मुलींमध्ये भेदभाव होतो व त्यांना समान वागणूक दिली जात नाही असं तिनं म्हटलं होतं. त्यावर आता अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिने स्पष्टीकरण दिलं आहे. नव्या नवेली नंदा हिचं ते वक्तव्य काही दिवसांपूर्वी प्रचंड चर्चेत आलं होतं.
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिच्या कुटुंबाबद्दल काही खुलासे केले होते. ती म्हणाली होती, ‘जेव्हा घरी पाहुणे येतात तेव्हा माझी आई मला त्यांच्याशी कसं वागावं, कसं नाही हे सांगत असते. पण हे ती माझ्या भावाला सांगत नाही. जेव्हा तुम्ही एका एकत्र कुटुंबात राहता तेव्हा मुलींना सर्वांची काळजी कशी घ्यायची, घर कसं चालवायचं हे सांगितलं जातं मात्र मुलांना हे कोणी सांगत नाही. त्यांना असं वाटतं की घरातील कामाच्या जबाबदाऱ्या या केवळ मुलींच्याच असतात.’
आणखी वाचा- प्रसिद्ध अभिनेत्यानं १५ वर्षीय रेखा यांना तब्बल ५ मिनिटं जबरदस्तीने केलं किस, अन्…
नव्याच्या या वक्तव्यावर तिची आई आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चननं स्पष्टीकरण दिलं आहे. नव्याच्या वक्तव्यावर बोलताना श्वेता म्हणाली, ‘नव्यानं जे सांगितलं ते अजिबात खरं नाहीये. आमच्या कुटुंबात मुला- मुलींमध्ये भेदभाव केला जात नाही. उलट घरातील सर्व कामं मी करते आणि माझी दोन्ही मुलं एका जागी बसून असतात. घरात जे होतच नाही ते अशाप्रकारे तिने सांगितल्यानंतर अगस्त्य आणि माझा नव्यासोबत वादही झाला आहे.’
आणखी वाचा- बिपाशा बासूच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा, पती करण सिंग ग्रोवर सोशल मीडियावर होतोय ट्रोल
दरम्यान नव्या नवेली नंदा ही बॉलिवूडपासून दूर आहे. कुटुंबात अभिनयाची पार्श्वभूमी असताना नव्याला मात्र यात अजिबात रुची नाही. तिला एक यशस्वी बिझनेसवूमन व्हायचं आहे. अलिकडेच नव्यानं तिचं शिक्षण पूर्ण केलं असून फॅमिली बिझनेस जॉइन करून त्यात यश मिळवणाची इच्छा तिनं एका मुलाखतीत व्यक्त केली होती.